लंडन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात चीनची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, चीनचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहा, तेथील रेल्वे असो किंवा विमानतळ, सर्वकाही निसर्गाशी निगडीत आहे. चीन निसर्गाशी घट्टपणे जोडलेला आहे. दुसरीकडे अमेरिकेविषयी बोलायचे तर तो स्वत:ला निसर्गापेक्षा मोठा समजतो. यावरून चीनला शांतता आवडते हे स्पष्ट होते. तेथील सरकार एखाद्या कॉर्पोरेशन सारखे काम करते.
राहुल गांधी असेही म्हणाले की ९/११ हल्ल्यानंतर अमेरिकेने बाहेरील लोकांना नोकरी देणे कमी केले. याऊलट चीनच्या साम्यवादी पक्षाने सद्बावना वाढवण्याचे काम केले. राहुल यांच्या भाषणाचा व्हीडीओ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी शेअर केला आहे. राहुल यांच्या या विधानावर भाजपने हरकत नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल परदेशात भारताला बदनाम करत असल्याचा आरोप केला आहे.
काश्मीरला म्हणाले तथाकथित हिंसक ठिकाण
राहुल यांनी भारतातील विरोधी पक्ष, नेते व लोकशाही संस्थांना येणा-या अडचणींचाही उल्लेख केला. राहुल म्हणाले माझ्या फोनची हेरगिरी होते. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. भारतातील विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला नेहमीच असा दबाव सहन करावा लागतो.
काश्मीरमध्ये पायी चालण्यास मनाई केली
राहुल गांधी म्हणाले की मी भारत जोडो यात्रा घेऊन काश्मीरला गेलो. तेव्हा सुरक्षा कर्मचा-यांनी मला काश्मीरमध्ये पायी चालण्यास मनाई केली. त्यांनी माअझ्यावर ग्रेनेड हल्ला होण्याची भीती व्यक्त केली. त्यानंतरही मी काश्मीरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत आपली यात्रा सुरू ठेवली. राहुल म्हणाले की, जम्मू काश्मीर एक तथाकथीत हिंसक ठिकाण आहे. मी काश्मीरच्या पुलवामात ४० जवान शहीद झालेल्या जागेवरही गेलो होतो.