36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीन पीओकेमध्ये उभारतोय क्षेपणास्त्र डागणारी यंत्रणा

चीन पीओकेमध्ये उभारतोय क्षेपणास्त्र डागणारी यंत्रणा

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी पायाभूत सुविधा उभारण्यात येत असून, यासाठी पाकिस्तानला चीन सहाय्य करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्षेपणास्त्र डागता येणारी यंत्रणा उभारण्यात येत असून, त्यासाठी पाकिस्तानला चीन मदत करत आहे. भारत – पाक, चीनमध्ये लडाख सीमेवर तणावाचे वातावरण असून, लष्कराने दोन आघाड्यांवर लढण्यास आपण सक्षम असल्याचे सांगितले आहे.

जमिनीवरून हवेत मारा करू शकणाºया क्षेपणास्त्रांसाठी पाकव्याप्त काश्मीरमधील लसाडाणा ढोक इथे पाकिस्तान व चीनचे लष्कर एकत्र बांधकाम करत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पाकिस्तानचे जवळपास १३० जवान व २५ ते ४० नागरिक या ठिकाणी काम करताना आढळले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील या साईटचे नियंत्रण पाकिस्तानी लष्कराच्या बाघ जिल्ह्यातील मुख्यालयातून करण्यात येणार आहे.

चिनी लष्कराचे नियंत्रण कक्षामध्ये तैनात
गुप्तचर यंत्रणांना असेही समजले आहे की, चिनी लष्कराचे १० अधिकारी या नियंत्रण कक्षामध्ये तैनात असतील. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम जिल्ह्यातील चिनारीमध्ये व हाथियान बाला जिल्ह्यातील चाकोठी येथेही अशाच प्रकारे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती आहे. पाकिस्तान व चीन या दोन्ही देशांची लष्करे एकमेकांच्या संपर्कात असून, उच्च स्तरावरील अधिकारी एकमेकांच्या सतत संपर्कात असल्याचे जून महिन्यात भारतीय लष्करी यंत्रणांच्या लक्षात आले होते.

पद्मनाभस्वामी मंदिरातील १० पुजा-यांना कोरोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या