18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयउपराष्ट्रपतींच्या अरुणाचल दौ-यावर चीनचा आक्षेप

उपराष्ट्रपतींच्या अरुणाचल दौ-यावर चीनचा आक्षेप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू अलीकडेच अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर गेले होते. यावर चीनने आक्षेप घेतला होता. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताचे राजकारणी नियमितपणे इतर कोणत्याही राज्याप्रमाणे अरुणाचल प्रदेशला भेट देतात. भारतीय नेत्यांच्या भारताच्या राज्याच्या दौ-यावर घेण्यात आलेल्या आक्षेपाचे कारण समजण्यापलीकडे आहे, असे प्रत्युत्तर परराष्ट्र मंत्रालयाने चीनला दिले आहे.

भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या तथाकथित अरुणाचल प्रदेशला चीन मान्यता देत नाही आणि भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या नुकत्याच झालेल्या दौ-याला तीव्र विरोध करतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले होते. अरुणाचल प्रदेशला चीनमध्ये झांगनान म्हणतात. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे या आठवड्यात अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौ-यावर होते. त्यांनी अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित केले होते. आपल्या दौ-यादरम्यान त्यांनी अरुणाचल प्रदेशातील लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर प्रमुख व्यक्तींशी संवाद साधला आणि त्यांना पुढे येऊन लिंगभेद आणि अंमली पदार्थांच्या व्यसनासारख्या विविध सामाजिक वाईट गोष्टींबद्दल तरुणांना शिक्षित करण्याचे आवाहन केले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या