25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनमुळे जगापुढे आणखी एक संकट; रॉकेटवरील नियंत्रण सुटले कधीही, कुठेही कोसळणार?

चीनमुळे जगापुढे आणखी एक संकट; रॉकेटवरील नियंत्रण सुटले कधीही, कुठेही कोसळणार?

एकमत ऑनलाईन

बीजिंग : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाची उत्पत्ती चीनच्या वुहानमधून झाल्याचेही जगजाहीर झाले आहे. जगावर हे संकट आणणा-या चीनने आता आणखी एक चिंता निर्माण केली आहे. चीनने अवकाशात सोडलेल्या लाँग मार्च ५ बी या रॉकेटवरील नियंत्रण सुटले आहे. त्यामुळे ते आता त्याच्या नेमलेल्या जागेऐवजी जगात दुसरीकडे कोठेही पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. चीनच्या या हलगर्जीपणामुळे जगापुढे नवे संकट उद्भवले आहे.

चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेतर्फे २९ एप्रिलला लाँग मार्च ५ बी या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. रॉकेटचे वजन २१ टन आहे. चीन बांधत असलेल्या नवीन अंतराळ स्थानकाचे हे पहिले मॉड्यूल लॉन्च केले होते. ठरवून दिलेल्या स्थानानुसार हे रॉकेट महासागरात कोसळणार होते. मात्र आता नियंत्रण सुटल्याने ते कोठे कोसळेल हे सांगता येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

१०० फुट लांब, १६ फुट रुंद
काही दिवसांतच ते रॉकेट पृथ्वीवर कोसळणार आहे. १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असे त्याचे आकारमान आहे. नियंत्रण सुटल्याने हे रॉकेट आता महासागराऐवजी जमिनीवर देखील कोसळू शकते, अशी माहिती चीनच्या या अंतराळमोहिमेचे वार्तांकन करणारे अँर्ड्यू जोन्स यांनी दिली आहे.

सलग दुसरे रॉकेट अपयशी
जोन्स यांच्या म्हणण्यानुसार, हे रॉकेट न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग, दक्षिण चिली, वेलिंग्टन आणि न्यूझीलंडच्या भागात कोसळू शकते. चीनने लाँग मार्च ५ बी ची चाचणी करण्यासाठी २०२० मध्ये प्रक्षेपित केले होते. त्याच्यावरीलही नियंत्रण सुटल्याने ते सहा दिवसानंतर पृथ्वीवर कोसळले होते.

दिल्ली विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या