20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home आंतरराष्ट्रीय कोरोना संकटकाळातही चीनने केली डिफेन्स बजेटमध्ये वाढ

कोरोना संकटकाळातही चीनने केली डिफेन्स बजेटमध्ये वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
कोरोना व्हायसरनं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात ओढले आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जग कोरोनाचा सामना करण्याचे तसेच, आपली आरोग्यसेवा बळकट करण्याचे प्रयत्न करत आहे. अशा संकटकाळातही चीन आपल्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अधिक जोर देताना दिसत आहे. चीनने आपल्या डिफेन्स बजेटमध्ये वाढ करून ते १७९ अब्ज डॉलर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनंतर संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणारा चीन हा दुसरा देश आहे.

चीनचे डिफेन्स बजेट भारताच्या डिफेन्स बजेटच्या तुलनेत तिप्पट आहे. गेल्या वर्षी चीनचे डिफेन्स बजेट १७७.६ अब्ज डॉलर्स होते. सद्य परिस्थितीत पाहता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चीनने आपल्या डिफेन्स बजेटमध्ये कमी वाढ केली आहे. कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला बसलेली खिळ हे यामागचे मुख्य कारण असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतही वाद सुरू आहेत. तसेच, कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी अमेरिकेने चीनलाच जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतील वाद हे मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत यावेळीही डिफेन्स बजेटमध्ये करण्यात आलेली वाढ महत्त्वाची मानली जात आहे.

Read More  शासनाच्या आदेशाचे पालन करणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक – आरोग्यमंत्री

शुक्रवारी चीनने सादर केलेल्या मसुद्यातील माहितीनुसार २०२० मध्ये चीनच्या डिफेन्स बजेटमधील वृद्धी दर हा ६.६ टक्के राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर २० लाख जवानांसह चीनचे सैन्य हे जगातिल सर्वात मोठे सैन्य ठरणार आहे. सलग पाचव्या वर्षी चीनने आपल्या डिफेन्स बजेटमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी वाढ केली असल्याची माहिती चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ न्यूजने दिली आहे. डिफेन्स बजेटच्या मसुद्यानुसार यावर्षी चीनचे डिफेन्स बजेट १ हजार २७० अब्ज युआन म्हणजेच १७९ अब्ज डॉलर्स इतकं असणार आहे.

पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
एका अहवालानुसार २०१९ मध्ये चीनचा संरक्षण क्षेत्रातील खर्च अमेरिकेच्या तुलनेत एक चतुर्थांश होता. अनेकदा चीनच्या डिफेन्स बजेटमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनसीपीचे) प्रवक्ते झांग युसुई यांनी मात्र डिफेन्स बजेमध्ये पारदर्शकता असल्याचे म्हटले आहे. चीनच्या सैन्याचा आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा विस्ताह हा त्यांच्या घोषणेपेक्षा अधिक असल्याचे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सरंक्षण क्षेत्रात चीन कोणताही छुपा खर्च करत नसल्याचेही युसुई यांनी म्हटले आहे़

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या