26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेची मध्यस्­थी चीनने धुडकावली!

अमेरिकेची मध्यस्­थी चीनने धुडकावली!

एकमत ऑनलाईन

बीजिंग: वृत्तसंस्था
भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमेवर गेल्­या काही दिवसांपासून तणावपूर्ण परिस्­थिती निर्माण झाली आहे. त्­यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्­थितीत भारत आणि चीन या दोन देशांतील सीमा प्रश्नात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्­ड ट्रम्­प यांनी मध्यस्­थी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तसा प्रस्­ताव ट्रम्प यांनी दोन्ही देशांना कळवला होता. मात्र ट्रम्­प यांचा प्रस्­ताव चीनकडून धुडकावून लावण्यात आले आहे.

यावर एका वृत्­त संस्­थेच्या वृत्­तानुसार चिनी परराष्­ट्र मंत्रालयाच्या प्रवक्­त्­याने चीन आणि भारत हे द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून या मुद्याचे निराकरण करण्यात आम्­ही सक्षम आहेत, असे म्­हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनमध्ये उद्भवलेल्या ताज्या सीमावादावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलल्याचे सांगितले होते. त्यांनी चीन सोबत सुरु असलेल्या सीमावादाबाबत मोदी हे चांगल्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. याचबरोबर ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्या सीमावादात आपण मध्यस्थाची भुमिका निभावण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

Read More  Mitron एप्लीकेशन पाकिस्तानी : चीनला विरोध करण्याच्या नादात या पाकिस्तानी मित्राला केले जवळ

ट्रम्प यांना त्यांनी बुधवारी केलेल्या मध्यस्थी करण्याबाबतच्या ट्विटसंदर्भात विचारले असता त्यांनी, जर भारत आणि चीनला याचा फायदा होईल असे वाटत असेल तर मी मध्यस्थी करायला तयार आहे, असे सांगितले. पण, ट्रम्प यांनी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कधी बोलले हे स्पष्ट केले नाही. ट्रम्प यांच्या या मध्यस्थीच्या प्रस्तावावर भारताने काल गुरुवारी आम्ही सीमावाद शांततेने सोडवण्यासाठी चीन बरोबर चर्चा सुरु केली आहे, असे सांगितले होते. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दोन्ही देशांनी लष्करी तसेच राजनैतिक स्तरावर सीमा वाद सोडवण्यासाठी व्यवस्था एक प्रस्थापित केली आहे. याद्वारे चर्चा करुन शांततेने हा वाद सोडवला जाईल, असे सांगितले. सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनच्या फिल्ड कमांडरनी चर्चा सुरु केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या