24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीनने केली अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी

चीनने केली अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी

एकमत ऑनलाईन

बीजिंग : भारत, जपान आणि अमेरिकेसोबत तणावाचे संबंध असताना आता चीनने या तणावात आणखीच भर टाकली आहे. चीनने दोन अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या रॉकेट फोर्सने नुकत्याच झालेल्या युद्ध सरावादरम्यान डीएफ-२६ आणि डीएफ-१६ क्षेपणास्त्रांची चाचणी केली असल्याची माहिती आहे.

चीनने ही चाचणी कधी व कोठे केली याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. चीनच्या डीएफ-२६ क्षेपणास्त्रे ही अणवस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ४००० किमी असल्याचे सांगतिले जाते. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात पूर्ण भारतासह पॅसिफिक महासागरातील अमेरिकेचा गुआम नाविक तळही येतो. चिनी लष्कराच्या ताफ्यात या क्षेपणास्त्राला २०१६ मध्ये सहभागी करण्यात आले होते. या क्षेपणास्त्रांमध्ये १२०० ते १८०० किलो वजनाचे अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.

चीनची दुसरे क्षेपणास्त्रे डीएफ १६ हे जुने क्षेपणास्त्र डीएफ १५ चे विकसित रुप आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ८०० ते १००० किलोमीटरपर्यंत आहे. त्याशिवाय हे क्षेपणास्त्र अणवस्त्र हल्ला करण्यासही सक्षम आहेत. हे क्षेपणास्त्र वजनाने हलके असल्यामुळे चिनी लष्कराला या क्षेपणास्त्राची वाहतूक करणे सोपे जाते. त्यामुळे देशाच्या कोणत्याही ठिकाणी हे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येऊ शकते.

युद्धजन्य परिस्थितीमुळे सराव : चीन
चिनी लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळाने दिलेल्या वृ्त्तानुसार, चिनी रॉकेट फोर्स ब्रिगेडचे कमांडर लियू यांग यांनी सांगितले की, आम्ही युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता हाय अलर्टवर आहोत. त्याशिवाय अणवस्त्र हल्ला झाल्यास उद्भवलेल्या आपात्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि त्वरीत कारवाई करण्यासाठी सज्ज राहण्यासाठी लष्कराचा सराव सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या