चीनची तैवानला युद्धाची धमकी

321

बीजिंग: वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत थेट आरोपीच्या पिंजºयात असलेल्या व उर्वरित जगातूनही विविध पातळ्यांवर सर्व बाजूंनी घेरला गेलेला चीन एकीकडे भारतातील लडाखमध्ये कुरापती करतो आहे, तर दुसरीकडे तैवानवर गुरगुरतो आहे. तैवान आणि चीनमधील संघर्ष नवा नाही; पण भारत अजिबातच भीक घालत नाही म्हटल्यावर कोरोनाकडून लक्ष वळविण्यासाठी चीनने आता सॉफ्ट टार्गेट निवडले आहे. चीनने तैवानला थेट युद्धाची धमकी दिली आहे. तैवानला एकीकरणाचा प्रस्ताव मान्य नसेल; तर आम्ही तैवानवर हल्ला करू, असा थेट इशारा चीनने दिला आहे.

याआधीही तैवानने आपले सार्वभौमत्व निर्विवाद असल्याचे जाहीर केलेले आहे. तैवानच्या चीनमधील विलीनीकरणासाठी चीनने तैवानवर दबावतंत्र सुरू करताच तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी खंबीरपणे हे दबावतंत्र मोडून काढले. त्साई इंग वेन यांनी अमेरिकेसह जगातील विविध देशांचा दौरा करून तैवानचा आवाज त्या त्या देशांत पोहोचविला आहे. त्साई इंग वेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधून चीनची आगळीक मोडून काढण्याबद्दल विनंती केली आहे आणि ट्रम्प यांनी त्साई इंग वेन यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Read More  हॉकी इंडियामध्ये ‘कोरोना’चा शिरकाव !दोन कर्मचार्‍यांना बाधा

तैवानला स्वतंत्र राहण्यापासून रोखण्याचे आणि चीनमध्ये विलीन होण्याचे आमचे खुले आवाहन आहे. ते तैवान मान्य करणार नसेल आणि आमच्यासमोर त्यासाठी इतर कुठलाही मार्ग शिल्लक नसेल, तर चीनकडून थेट हल्ला केला जाईल, असा इशारा चीनने इवल्याशा तैवानला दिला आहे.