22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीनचे कृत्य कधीच विसरणार नाही : ट्रम्प

चीनचे कृत्य कधीच विसरणार नाही : ट्रम्प

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागले असून, प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला असून, कोरोनाचा फैलाव केल्याबद्दल टीका केली. तसेच, चीनने आपल्यासोबत जे केले आहे ते कधीच विसरणार नाही, असा पुनरुच्चार केला. चीनसोबत जे सुरु आहे याचा कोणी कधी विचारही केला नव्हता.

जोपर्यंत कोरोना आला नव्हता तोपर्यंत आपण त्यांच्यापेक्षा उत्तम कामगिरी करत होतो. आपण कोरोनामधून बाहेर येत असून, जवळपास २० लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती होती. पण आपण योग्य निर्णय घेतल्याने ही संख्या दोन लाख आहे. आपण कोणाचाही मृत्यू होऊ द्यायला नको होते. त्यांनी आपल्यासोबत जे केले आहे ते विसरणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी कोरोनाचा प्रसार होण्याआधी अमेरिका सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती असे म्हटले. यावेळी त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कृत्रिम असल्याचा दावा केला.

खा.चिखलीकरांमुळे मिळालेल्या आमदारकीचा लोककल्याणासाठी वापर करा

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या