24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतिबेटमध्ये चीनचा युद्धसराव

तिबेटमध्ये चीनचा युद्धसराव

- ड्रोन विमानांमधून बॉम्बफेक - पडद्यामागे मात्र चीनचे दुसरेच मनसुबे

एकमत ऑनलाईन

लडाख: वृत्तसंस्था
लडाखमध्ये चीनला लागून असणा-या सीमेवर सध्या तणावाची स्थिती आहे. भारत आणि चीनचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. अमेरिकेने चीनला कुटनीतिक मार्गाने या वादावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. चीनही चर्चेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय असे दाखवत असला तरी, पडद्यामागे मात्र चीनचे दुसरेच मनसुबे आहेत.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांडने अलीकडेच रात्रीच्या अंधारात उंचावरील क्षेत्रात युद्ध लढण्याचा सराव केला. शत्रुच्या प्रदेशात घुसखोरीचा युद्धाभ्यास करण्यासाठी त्यांनी ४ हजार ७०० मीटर उंचीवर सैन्य पाठवले होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत युद्ध लढण्याच्या आपल्या क्षमतेची त्यांनी चाचणी घेतली. चिनी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सने हे वृत्त दिले आहे. नेमका किती तारखेला हा युद्ध सराव झाला त्याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण रात्री एकच्या सुमारास तिबेट मिलिट्री कमांडच्या युनिटने तांगगुला पर्वतरांगांमध्ये हा युद्ध सराव केला. या युद्धसरावामध्ये चीनने ड्रोन विमानांमधून बॉम्बफेकही केली.

Read More  राहुल गांधींचा सरकारला सवाल : उत्तर द्या, ‘चिनी सैन्य भारतीय हद्दीत खरंच घुसलंय का?

भारत आणि चीनची सीमा उंचावरील क्षेत्रामध्ये आहे. अलीकडेच दोन्ही देशांमध्ये काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे तिथे अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत असे ग्लोबल टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. भारत-चीन सीमेवर स्थिती स्थिर आणि नियंत्रणात असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी म्हटले होते.
अंधारात केली चाचणी
चीन सेंट्रल टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) नें दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १ वाजता पीएलएच्या स्काऊट युनिटनं तांगुला या टेकडीकडे वाटचाल सुरू केली. या मार्चदरम्यान गाड्यांच्या लाईट बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच, भारताच्या ड्रोनपासून वाचण्यासाठी नाईट व्हिजन डिव्हाइसची मदत घेतली गेली. रस्त्यात येणारे अडथळे पार करण्यासाठी ड्रोनच्या मदतीने बॉम्बस्फोट करण्यात आले. टार्गेटच्याजवळ पोहचल्यानंतर कॉम्बॅट टेस्टही करण्यात आली. यासाठी स्रायपर युनिट पुढे पाठवण्यात आलं होतं. फायर स्ट्राईक टीमने एक हलक्या हत्यारांची गाडी अँटी टँक रॉकेटने उडवून दिली.

अमेरिकेची चीनवर टीका
भारताची सीमा, हाँगकाँग किंवा दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कारवाया या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या वर्तनाचाच एक भाग आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. चीनचे सैनिक मोठ्या प्रमाणावर भारताच्या उत्तरेकडे सरकल्याचे चित्र दिसत आहे, हाँगकाँगमधील जनतेच्या स्वातंर्त्यावरही चीनने घाला घातला आहे, असेही पॉम्पिओ यांनी वादग्रस्त कायद्याच्या अनुषंगाने म्हटले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन वेगाने लष्करी आणि आर्थिक कारवाया करीत आहे, त्यामुळे त्या क्षेत्रातील अनेक देशांची चिंता वाढली आहे, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या