27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनच्या कंपनीने केला दावा : पुढच्या टप्प्यात १५०० लोकांवर चाचणी

चीनच्या कंपनीने केला दावा : पुढच्या टप्प्यात १५०० लोकांवर चाचणी

एकमत ऑनलाईन

चीन : चीनच्या सिनोफार्म कंपनीने दावा केला आहे की, त्यांच्या लसीचे ‘इम्यून रिस्पॉन्स ट्रायल’ दरम्यान सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. याशिवाय लसीचे अंतीम टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. जगभरातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षाच्या सुरूवातीपर्यंत लस उपलब्ध होऊ शकते. लसीच्या शर्यतीत ब्रिटेन, अमेरिका, चीन सगळ्यात पुढे आहेत. सिनोफार्मच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या आणि मधल्या टप्प्यातील परिक्षणादरम्यान ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आलं असून रोगप्रतिकारकशक्ती वाढवून एँटीबॉडी निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे.

आता रेग्युलेटरी अप्रुवलसाठी एडवांस लेवल टेस्टिंग केली जाणार आहे. सिनोफार्म कंपनीचे चेअरमन यांनी मागच्या महिन्यात माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार एक परिणामकारक लस या वर्षाच्या शेवटापर्यंत तयार होऊ शकते. सिनोफार्मच्या संशोधकांनी आणि ‘डिसीज कंट्रोल ऑथोरिटीज ऑफ चाइना’ हा रिपोर्ट ‘जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल एसोसिएशन’ (JAMA) मध्ये प्रकाशित केला आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार पहिल्या आणि त्यानंतरच्या टप्प्यातील परिक्षणासाठी ३२९ निरोगी व्यक्तींना सामिल करून घेण्यात आलं होतं.

या स्वयंसेवकांवर कोणतेही साईडईफेक्ट्स दिसून आले नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या टप्प्यात १५०० लोकांवर चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी करारानुसार या लसीचे डोस पाकिस्तानात पुरवले जाणार आहेत. दरम्यान चीन ८ वेगवेगळ्या लसींवर संशोधन करत आहे. लस तयार झाल्यानंतर नागरीकांपर्यंत विनामुल्य पुरवण्यात यावी असं अमेरिकेनं ठरवलं आहे.

दरम्यान कोरोनाची लस शंभर टक्के प्रभावी असण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र, ही लस ५० टक्के जरी प्रभावी असेल, तर एक वर्षाच्या आत जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असे संसर्गजन्य रोगांचे अमेरिकेतील आघाडीचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे. कोरोना साथीसंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार म्हणूनही फौसी सध्या काम पाहत आहेत. त्यांनी सांगितले की, पुढच्या वर्षीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर या साथीला प्रभावी आळा घालता येईल. त्यामुळे २०२१ च्या अखेरीपर्यंत जगातील जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस विकसित झाली तरी हा विषाणू पृथ्वीतलावरून नष्ट होणार नाही, याची प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे. जगातून फक्त देवीचे विषाणू नष्ट करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कोरोनाच्या लसीमुळे या विषाणूचे उपद्रव्यमूल्य कमी करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या