22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचिनी अण्वस्त्रांची तैवानच्या सीमेत घुसखोरी

चिनी अण्वस्त्रांची तैवानच्या सीमेत घुसखोरी

एकमत ऑनलाईन

तैपेई : तैपेईमध्ये अमेरिकन खासदारांच्या आगमनानंतर, चिनी सैन्याने तैवानवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी लष्करी सराव सुरू केला आहे. सोमवार ते बुधवार दरम्यान २२ चिनी लढाऊ विमाने आणि पाच युद्धनौकांनी तैवानच्या सीमेचे उल्लंघन केले आहे.

तैवान टाईम्सने राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयच्या हवाल्याने म्हटले आहे की, या पीएलए फायटर आणि जहाजांनी चीन आणि तैवानमधील मध्यरेषा ओलांडली आहे. तत्पूर्वी, अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवानच्या भेटीदरम्यान, चीनने या प्रदेशात १०० हून अधिक जेट्स आणि २२ युद्धनौकांसह जवळपास एक आठवडाभर लष्करी कवायती केल्या होत्या. चीनचे राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्रालय आणि पीएलए अशा दौ-यांविरोधात अमेरिकेला वारंवार धमकी देत ​​आहेत. तैवानच्या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या विमानांमध्ये चार सुखोई एसयू-३० लढाऊ विमाने, तीन शेनयांग जे-११ जेट फायटर, दोन शेनयांग जे-१६ जेट फायटर आणि एक शानक्सी वाय-८ वाहतूक विमानांचा समावेश आहे.

तैवानचा युध्दसराव सुरू
तैवाननेही हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सराव सुरू केला आहे. तैवानच्या सैन्याने बुधवारी आग्नेय काउंटी हुइलियनमध्ये लष्करी कवायती केल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सन ली-फँग यांनी सांगितले की, त्यांनी चिनी जहाजे आणि विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी लढाऊ पाळत ठेवणारी विमाने आणि युद्धनौका मध्य रेषेवर पाठवली आहेत. तैवानच्या लष्कराने तैवानच्या आखाताच्या मध्यरेषा ओलांडणा-या पाच चिनी विमानांना रोखले. चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हवाई गस्तीची विमाने आणि जहाजे सतत तैनात असतात. यासोबतच किनारपट्टीवर आधारित क्षेपणास्त्र यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या