ओंडो : नायजेरियात एका कॅथलिक चर्चमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर आली. या गोळीबारात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रविवारी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना सशस्त्र लोक ओंडो शहरातील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये घुसले आणि त्यांनी गोळीबार केला.
हल्लेखोरांनी ओंडो राज्यातील सेंट फ्रान्सिसच्या कॅथलिक चर्चला लक्ष्य केले. पेंटेकॉस्ट संडे या ख्रिश्चन सणानिमित्त तेथे भाविक जमल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. मृतांमध्ये अनेक मुलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ते घटनास्थळी आणि रुग्णालयातही गेले. ओलुवोले म्हणाले की, ओवोच्या इतिहासात अशी घटना आम्ही कधीच अनुभवली नाही. नायजेरियाच्या लोअर लेजिस्लेटिव्ह चेंबरमधील ओंडो प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे अडेलेग्बे तिमिलीन म्हणाले की, पुजारी यांचेही अपहरण करण्यात आले.
अधिका-यांनी तात्काळ मृतांची संख्या जाहीर केली नाही. परंतु टिमलेन यांनी सांगितले की, किमान ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.