26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसिगारेट देणार ‘मृत्यू’चा इशारा!

सिगारेट देणार ‘मृत्यू’चा इशारा!

एकमत ऑनलाईन

ओटावा : सिगारेटच्या पॅकेटवर कॅन्सरच्या धोक्याचा इशारा छापलेला सर्वांनी पाहिला असेल; पण लवकरच प्रत्येक सिगारेटवर कॅन्सरचा धोका असणारा इशारा दिसेल. वास्तविक, कायद्यानुसार सिगारेट विकणा-या कंपन्यांना सिगारेटच्या पॅकेटवर वैधानिक इशारा लिहिणे बंधनकारक आहे. यामध्ये सिगारेटमुळे होणा-या हानी आणि कॅन्सरबाबत इशारे छापण्यात आले.

सिगारेटमुळे होणारे वाढते आजार पाहता, प्रत्येक सिगारेटवर हा वैधानिक इशारा छापलेला दिसेल. कॅनडा हा प्रत्येक सिगारेटवर वैधानिक कर्करोगाचा इशारा देणारा जगातील पहिला देश बनला. कॅनडामध्ये प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा चिन्हांकित करणे आवश््यक आहे. यापूर्वी देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगवर इशारा म्हणून ग्राफिक चित्र लावण्याचे धोरण लागू करण्यात आले होते. कॅनडा पुन्हा एकदा धुम्रपानाच्या बाबतीत जगासमोर मोठं उदाहरण ठेवत आहे. त्यामुळे प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारे लिहिणारा कॅनडा हा जगातला पहिला देश ठरेल. कॅनडाचे मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनता मंत्री कॅरोलिन बेनेट म्हणाले, सध्या लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर लिहिलेल्या इशा-याकडे लक्ष देत नाहीत. त्यांचे नावीन्य आणि प्रभाव कमी झाला आहे या गोष्टीकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे.

कॅरोलिन बेनेट पुढं म्हणाले, २०२३ च्या उत्तरार्धात या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची योजना आखली आहे. याअंतर्गत आपण प्रत्येक सिगारेटवर ‘प्रत्येक पाकिटमध्ये विष’ असा संदेश लिहिणार आहोत. या प्रस्तावाचे स्वागत करताना कॅनडा हार्ट अँड स्ट्रोक फाउंंडेशनचे सीईओ डग रॉथ म्हणाले, कॅनडामध्ये आता सिगारेटसाठी जगातील सर्वात मजबूत आरोग्यविषयक सूचना देणारी यंत्रणा उपलब्ध होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या