23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयबांग्लादेशात महागाईमुळे नागरिक रस्त्यावर

बांग्लादेशात महागाईमुळे नागरिक रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

ढाका : श्रीलंकेच्या आर्थिक संकटानंतर भारताचा आणखी एक शेजारी आर्थिक गर्तेत अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान नंतर बांग्लादेशातील महागाईने नागरिकांच्या समस्येत आणखी वाढ झाली आहे.

एका रात्रीत पेट्रोल ५१ टक्क्यांनी महाग झाले असून या संकटामुळे तेथील जनतेने रस्त्यावर उतरत जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली आहे.

बांग्लादेशात एका रात्रीत पेट्रोलचे भाव तब्बल ५१ टक्क्यांनी वाढल्यामुळे पेट्रोल प्रतीलिटर १३५ टकाच्या वर पोहोचले आहे. दरम्यान बांग्लादेशने पेट्रोल दरवाढीची घोषणा केल्यानंतर लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती पण या महागाईचा फायदा उचलण्यासाठी पेट्रोल पंपचालकांनी पेट्रोल पंप बंद केले त्यामुळे संतापलेले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. रशिया युक्रेन युद्ध आणि कोरोना महामारीनंतर बांग्लादेशात महागाई वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.

बांग्लादेशच्या परिस्थितीचा चीनकडून फायदा?
बांग्लादेशच्या या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी चीनची पावले पडताना दिसत असून चीनचे परराष्ट्रमंत्री ढाक्यात पोहोचले आहेत. त्यांच्या आर्थिक मदतीविषयी चर्चा सुरू आहेत पण चीनच्या नादी लागल्याने श्रीलंकेची काय परिस्थिती झाली हे उदाहरण बांग्लादेशपुढे आहेच. दरम्यान आपल्या शेजारी राष्ट्रांना आर्थिक मदत करून त्यांचा फायदा उचलण्यात चीन माहिर आहे. त्यामध्ये आता बांग्लादेशचा समावेश होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या