नाईपीताओ : म्यानमारमध्ये लष्कराने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या बंडाला विरोध दर्शवण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील आठवडाभरपासून सुरु असणाºया आंदोलनामध्ये शुक्रवारीही मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. काही ठिकाणी तर म्यानमारमधील नागरिकांनी थेट चीनविरोधात मोर्चांचे आयोजन केले आहे. चीन हा शांतताप्रिय म्यानमारमध्ये अशांतता पसरवण्याचे काम करत आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
लाँग लिव्ह मदर सू’ आणि ‘लष्करी हुकूमशाहीचा निषेध असो’ अशा घोषणा देत हजारो नागरिक लष्करी हुकूमशाह कमांडर-इन चीफ जन. मिन आँग हलेइंगविरोधात घोषणा देत आहे. म्यानमारमधील चिनी दुतावासाच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त आहे. अनेक आंदोलकांनी शेम आॅन यू चायना म्हणजेच चीनची आम्हाला लाज वाटते असे बॅनर हातात पकडल्याचे वृत्त म्यानमार नाऊने दिले आहे.
आंदलोनामध्ये सहभागी झालेल्या एका आंदोलकाने, चीनने म्यानमारमधील सेनेला लोकशाही दाबून टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले, असा आरोप केला आहे. वेगवेगळ्या वयोगटातील नागरिक चीनविरोधातील या मोर्चांमध्ये आणि आंदोलनांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या समाजातील सर्वच स्तरातील नागरिक लोकशाही मार्गेने निवडून दिलेल्या सरकारच्या ताब्यात पुन्हा देशाचा कारभार द्यावा अशी मागणी केली आहे. लष्करी हुकूमशाहीचे समर्थन करणे बंद करा, असे फलक घेऊन अनेक आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक निदर्शनांमध्ये कामगार संघटना, विद्यार्थी कार्यकर्ते आणि नागरिकांचा हजारोंच्या संख्येने सहभाग दिसून येत आहे. काही ठिकाणी चीनबरोबरच रशियाही या सत्तांतरणाच्या कटामध्ये सहभागी आहे का असा प्रश्न उपस्थित करणारे बॅनर घेऊन नागरिक आंदोलनात उतरल्याचे चित्र दिसत आहे.
केंद्राच्या सर्व कर्मचा-यांना कार्यालयात जाणे आवश्यक