24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनमधून कंपन्या भारतात येण्याचा मार्ग मोकळा

चीनमधून कंपन्या भारतात येण्याचा मार्ग मोकळा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सचिवांच्या उच्चाधिकार समितीची बैठक शुक्रवारी झाली आणि चीनमधून भारतात आणल्या जार्णा­या मशिनरीच्या मूल्यांकनाची तरतूद रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. ही तरतूद रद्द केल्यामुळे अनेक कंपन्या आपापले चीनमधील प्लांट वेगाने भारतात हलवतील, असे मानले जात आहे.

चीनसह दक्षिण कोरियातून येर्णा­या प्लांट आणि प्लांटशी संबंधित यंत्रणेचे मूल्यमापन यापूर्वी केले जात असे. मुख्यत: ॲपलचा याला आक्षेप होता. ॲपलसोबतच सॅमसंग, फॉक्सकॉन, ओप्पो, व्हिव्हो आणि फ्लेक्सट्रॉनिक्स या कंपन्यांना आता देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादन केंद्रीत भत्ता योजनेंतर्गत (पीएलआय) अतिरिक्त उत्पादन करता येईल. ॲपलच्या भारतातील उत्पादन निर्मिती भागीदार असलेल्या विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन या कंपन्यांच्या माध्यमातून ॲपलकडून चीनमधील निर्मितीचे अनेक प्लांट पीएलआय योजनेचा लाभ घेऊन भारतात स्थलांतरित केले जाऊ शकतात.

Read More  खरीप पिकांच्या विम्याची शेवटची तारीख 31 जुलै 2020

मशिनरीच्या सरकारी मूल्यमापनाला ॲपलचा आक्षेप होता. सरकार सध्या ॲपलचा तिसरी निर्मिती भागीदार असलेल्या पेगाट्रॉन कंपनीसोबतही चर्चा करत आहे. या कंपनीकडूनही भारतात प्लांट येणे अपेक्षित आहे. सध्या चीनमध्ये असलेल्या अमेरिकन कंपन्या भारतात आणण्यावर भारत सरकारचा भर आहे. नैसर्गिक आपत्तीत कंपन्यांना काही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही देण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणात मोबाई फोन निर्मिती कंपन्या भारतात याव्या आणि यातून निर्यात वृद्धी व्हावी, असे सरकारचे नियोजन आहे. सरकारी सवलतींचा लाभ मिळवायचा तर उत्पादकांना दुस-या, तिस-या, चौथ्या आणि पाचव्या वर्षात अनुक्रमे ८ हजार कोटी, १५ हजार कोटी, २० हजार कोटी आणि २५ हजार कोटी रुपयांच्या फोनची निर्मिती करावी लागेल. याबाबतची अधिसूचना पुढील आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. परकीय आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी पात्रता अटींत फरक आहे. पात्र कंपन्यांसाठी ४० हजार ९५१ कोटी रुपयांचा निधी ठरविण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या