23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयवातावरण बदलामुळे वाढतंय विस्थापितांचेही प्रमाण

वातावरण बदलामुळे वाढतंय विस्थापितांचेही प्रमाण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या काही दशकांपासून जगभरात वातावरण बदलाचा मोठा फटका बसत आहे. बदलत्या पर्यावरणामुळे गेल्या पाच दशकात ६८ टक्के जैवसंपदा तर नष्ट झालीच पण रोजीरोटी संपल्यामुळे माणसांचे विस्थापन होण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. अनेक देशांमध्ये जलसंकट निर्माण झाल्यामुळे विशेषकरुन आशिया व आफ्रिकेतील देशांमधून नागरिक मोठ्या संख्येने युरोपासह दुस-या समृद्ध देशांमध्ये पलायन करीत आहेत.

वातावरण बदलांमुळे दुस-या देशात आश्रय घेणा-यांना आता उपहासाने ‘क्लायमेट रेफ्युजी’ असे संबोधले जात आहे. ज्या देशात जे आश्रय घेत आहेत, तेथील मुळ निवासींबरोबर त्यांचे वाद होत आहेत. विस्थापितांबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने जारी केलेल्या अहवालात याबद्दल माहिती दिली आहे. आशिया खंडातून भारत व चीनमधून सर्वाधिक नागरिक अमेरिकेत पलायन करीत आहेत. सीरीयातून तुर्कीमध्ये पलायनही मोठ्या प्रमाणात होत आहे. संयुक्त अरब अमिरातीतही भारतीय वंशाच्या लोकांचे पलायन मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतातही परदेशातून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक नागरिक बांग्लादेशामधून येत आहेत.

युरोपात चार वर्षात ११ टक्के अधिक विस्थापित
अहवालानूसार वर्ष २०१९ उत्­तर अमेरिकेत सुमारे १.७० कोटी आशियाई वंशाचे नागरिक होते. वर्ष २०१५ पेक्षा हे प्रमाण १० लाख अधिक आहे. युरोपमध्ये वर्ष २०१९ मध्ये आशियाई वंशाच्या नागरिकांची संख्या सुमारे २.२ कोटी इतकी आहे. जी २०१५ पेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. आफ्रिका खंडातील अल्जिरियामधून सर्वाधिक नागरिक फ्रान्समध्ये पलायन करतात. युगांडा और ट्युनेशियातूनही मोठ्या संख्येने स्थलांतर होते. मोरोक्कोमधून इटली व स्­पेनमध्ये मोठ्या संख्येने विस्थापित लोक जात आहेत. वर्ष २०१५ ते १९ दरम्यान युरोपातील गैरयुरोपीय नागरिकांची संख्या ३.५० कोटीवरुन ३.८० कोटी इतकी वाढली.

रेल्वेमध्ये पार्सलची अ‍ॅडव्हान्स बुकींग सुरु

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या