27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीय‘डब्ल्यूटीओ’ मंत्रिपरिषदेचा समारोप

‘डब्ल्यूटीओ’ मंत्रिपरिषदेचा समारोप

एकमत ऑनलाईन

जीनिव्हा : जागतिक व्यापार संघटनेच्या इतिहासात प्रथमच मंत्रिपरिषदेचा कालावधी एका दिवसाने वाढविण्यात आल्यानंतर बहुराष्ट्रीय व्यापारी धोरण अबाधित रहायला हवे, यासाठी सर्व सदस्य देशांनी रात्रभर वाटाघाटी केल्या आणि बाराव्या मंत्रिपरिषदेचा समारोप केला.

हा समारोप करताना काही सकारात्मक जाहीरनामे करण्यात आले हे विशेष! मंत्रिपरिषदेत काही तोडगा निघाला नाही तरी आपल्याला फायदा होणार असल्याचे माहिती असल्याने भारताकडून कुठल्याही तडजोडीला अधिक महत्त्व दिले जात नव्हते.

आम्ही पुढील दोन वर्षे इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशनवर कुठलेही कर लावणार नाही, असे अप्रत्यक्षरीत्या ‘डब्लूटीओ’ प्रशासनाला कळविले. तसेच, ‘डब्लूटीओ’च्या महासंचालकांच्या विनंतीला मान देत बौद्धिक संपदा आणि पेटंट सवलतीच्या मागणीवरही भारताने काही अंशी माघार घेतली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या