23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनमधून बाहेर पडणा-या कंपन्या व्हिएतनामला

चीनमधून बाहेर पडणा-या कंपन्या व्हिएतनामला

- भारतात अद्याप चर्चाच - वास्तवातले चित्र वेगळे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडू शकतात. या सर्व कंपन्यांना गुंतवणूकीसाठी आकर्षित करण्याची हीच नामी संधी आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये सुरु आहे. भारतात अजून चर्चाच सुरु आहे. पण वास्तवातले चित्र मात्र यापेक्षा थोडे वेगळे आहे. चीनमधून काही कंपन्या बाहेरही पडल्या आहेत. पण यामागे फक्त कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हे एकमेव कारण नाही आहे़ अमेरिका-चीनमध्ये सुरु असलेले व्यापार युद्धही त्याला कारणीभूत आहे.

उत्तर अमेरिकन आणि युरोपियन खरेदीदारांकडून अचानक दक्षिण पूर्व आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये तपासणी आणि आॅडिट करण्याची मागणी वाढली, असे हाँगकाँग स्थित किमा कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे. किमा ही क्वालिटी कंट्रोल कंपनी आहे. वेगवेगळया कंपन्या नव्या भागांमध्ये आपले कारखाने हलवण्याआधी या तपासणी आणि आॅडिट रिपोर्टची मदत घेतात. किमाच्या रिपोर्टनुसार दक्षिण पूर्व आशियासाठी ४५ टक्के मागणी वाढली. यामध्ये व्हिएतनाम, म्यानमार आणि फिलीपाईन्स हे देश आहेत. दक्षिण आशियासाठी ५२ टक्के मागणी होती. यात कापड उद्योगासाठी बांग्लादेशला विशेष पसंती आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये लॉकडाउन असताना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात उद्योग-व्यवसायासाठी दुसºया ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ही मागणी वाढली होती.

Read More  इम्रान खान यांना भारतीय सुरक्षा एजन्सींकडून झटका

चीनची भारतावर टीका
चीनमधून व्यापार शिफ्ट करण्याच्या भावनेमुळे तिथून बाहेर पडणारे उद्योग-व्यवसाय आपल्या देशात आकर्षित करता येऊ शकतात, ही अपेक्षा भारतामध्ये निर्माण झाली. उत्तर प्रदेश सारख्या राज्याने यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली. कामगार कायद्यामध्ये बदल केले. त्यावर चीनच्या ग्लोबल टाइम्समधून टीका करण्यात आली. पण ज्या कंपन्या चीनमधून बाहेर पडतायत, त्या सगळयाच भारतामध्ये येत नाही आहेत़

कंपन्यांचा सुरक्षित देशात जाण्याचा कल
जपानी वित्तीय समूह नोमुरानुसार या कंपन्यांचे प्राधान्य दक्षिण-पूर्व आशियाला आहे. नोमुराच्या पाहणीनुसार, २०१८-१९ मध्ये चीनमधून बाहेर पडलेल्या ५६ कंपन्यांपैकी व्हिएतनाममध्ये २६, तैवानमध्ये ११, थायंडलमध्ये आठ कंपन्यांनी आपली कार्यालये सुरु केली. फक्त तीन कंपन्या भारतामध्ये आल्या.

कीमाच्या रिपोर्टनुसार सुरक्षित स्थळांना कंपन्यांचे पहिले प्राधान्य आहे. याचाच अर्थ कोरोना व्हायरसचे संकट चांगल्या पद्धतीने हाताळणाºया देशांमध्ये या कंपन्या जाऊ शकतात. कोरोना व्हायरसच्या हाताळणीमध्ये व्हिएतनाम आदर्श उदाहरण आहे. या देशाने अत्यंत वेगाने पावले उचलत कोरोनावर नियंत्रण मिळवले. या देशात कोरोनाचे ३२७ रुग्ण होते व एकही मृत्यू झाला नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या