23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home आंतरराष्ट्रीय गोपनीय कराराने वाढवली चिंता : चीन आणि पाकिस्तानची सिक्रेट डील

गोपनीय कराराने वाढवली चिंता : चीन आणि पाकिस्तानची सिक्रेट डील

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जगात दहशतवादाचा रक्तरंजित खेळ खेळणारा पाकिस्तान आणि कोरोना व्हायरस पसरवून संपूर्ण जगात प्रकोपासाठी जबाबदार असलेल्या चीनने एकत्र येत आता भारत आणि पश्चिमी देशांना बरबाद करण्यासाठी तीन वर्षांची सीक्रेट डील केली आहे. या डीलमध्ये क्लाक्सोनने अनेक इंटेलिजन्स एजन्सीजच्या संदर्भाने म्हटले आहे की, जैविक युद्ध क्षमता विस्तारात घातक संसर्गजन्य एजंट अंथरेक्ससह अनेक रिसर्च प्रोजेक्टला सामिल केले आहे. याबाबचा खुलासा एका रिपोर्टमध्ये केला आहे, ज्यावरून सिक्युरिटी एक्सपर्ट अँथोनी क्लानने एक आर्टिकलसुद्धा लिहिले आहे.

पाकिस्तानसोबत मिळून जैविक युद्धाच्या तयारीचा कट रचण्यास सुरूवात
या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे की, चीन जगाच्या नजरेतून स्वत:ला दूर करत जैविक युद्धासाठी पाकिस्तानला केंद्र बनवत आहे. यानुसार, वुहानच्या ज्या लॅबमधून कोरोना व्हायरस बाहेर पडल्याचा दावा अमेरिका करत आहे, त्याच लॅबने पाकिस्तानसोबत मिळून जैविक युद्धाच्या तयारीचा कट रचण्यास सुरूवात केली आहे. निशाण्यावर भारतासह पश्चिमी देश जसे की अमेरिकासुद्धा असू शकते. या देशांना संसर्ग आजारांचा निशाणा बनवण्यात येईल. चीनने पाकिस्तानच्या संशोधकांना याबाबचा डाटा आणि दुसरी आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली आहे. या संशोधनात जेवढा खर्च होईल तो वुहान लॅब करणार आहे.

आपल्या सीमेच्या बाहेर जैविक शस्त्रांवर टेस्टींग करत आहे
या रिपोर्टमध्ये अँथनी क्लॅनने म्हटले आहे की, वुहान लॅबने पाकिस्तानची मिलिट्री डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायजेशनसोबत संसर्गजन्य आजारांवर रिसर्च आणि संसर्गजन्य आजारांच्या जैविक नियंत्रणासाठी करार केला आहे. पाकिस्तानसोबतच्या चीनच्या या कराराने चिंता वाढवली आहे. चीन कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर जागतिक स्तरावर घेरला गेल्याने आपल्या सीमेच्या बाहेर जैविक शस्त्रांवर टेस्टींग करत आहे. दिलासादायक बाब ही आहे की, भारत आणि पश्चिमी देशांच्या इंटेलिजन्स एजन्सीजना याबाबत माहिती मिळाली आहे.

 कोरोना पसरवल्यामुळे चीनवर जगभरातून टिका होत आहे
चीन आणि पाकिस्तानच्या डीलवर एक्सपर्टचे म्हणणे आहे की, चीनला धोकादायक बायो केमिकल रिसर्चसाठी पाकिस्तानला केंद्र म्हणून सादर करायचे आहे आणि स्वत:ला कोणत्याही टिकेपासून दूर ठेवायचे आहे. कारण अगोदरच कोरोना पसरवल्यामुळे चीनवर जगभरातून टिका होत आहे. सोबतच भारत आणि पश्चिमी इंटेलिजन्स एजन्सीजचे म्हणणे आहे की, चीन या प्रोजेक्टमध्ये यासाठी उतरला आहे कारण भारत आणि पाकिस्तानला एकमेकासमोर त्याला उभे करायचे आहे.

Read More  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow