Tuesday, September 26, 2023

कोरोनामुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम

बीजिंग: कोरोना विषाणू संसर्गाने अनेक देशात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूमुळे मानवी आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात. याबाबतचे ही संशोधन सुरू आहे. नुकत्याच समोर आलेल्या संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे संशोधनात समोर आले आहे.

चीनमधील टफ्ट्स युनिर्व्हसिटी आणि गोंगई मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातही बाब समोर आली आहे. पुरुषांच्या अंडकोषात विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याचे त्यांना आढळले. कोरोनाबाधितांच्या अंडकोषात शुक्राणू निर्माण करणाºया पेशींमध्ये बदल होत आहे. त्यामुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची शंका संशोधकांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे पुरुषांच्या वीर्याला नुकसान होऊ शकते. त्यामुळेच शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. त्याशिवाय रुग्णाची परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास शुक्राणूंची निर्मिती थांबू शकते, असा इशाराही संशोधकांनी दिला. कोरोना विषाणू हा मुख्यत: खोकला, सर्दी, बोलण्यातून हवेत उडणा-या लाळेतील तुषार कणांमुळे फैलावतो. कोरोनाचा संसर्ग सेक्स केल्यामुळेदेखील फैलावू शकतो का, याबाबतही संशोधनही सुरू आहे. आतापर्यंत केलेल्या संशोधनानुसार शुक्राणूमध्ये कोरोनाचा विषाणू आढळला नसल्याचे समोर आले आहे.

read More  नुकसान भरपाईसाठी शासनाने 5 हजार कोटींची मदत द्यावी – रामदास आठवले

विषाणू पुरुषांतील अंडकोषात स्थान निर्माण करतो
काही संशोधनानुसार, कोरोनाचा विषाणू पुरुषांतील अंडकोषात आपले स्थान निर्माण करू शकतात. त्यामुळे सध्या तरी लोकांनी स्पर्म डोनेट न करण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. संशोधकांनी १२ पुरुषांच्या अंडकोषाच्या पेशीचा बॉयोप्सी केली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे या पेशी निष्क्रीय झाल्या असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात थैमान घातले असून, अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या आजारावर अनेक देशांमध्ये संशोधन सुरू असून, आजाराबाबत खबरदारी घेण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरत आहे. कोरोनाच्या आजारात रुग्णांना श्वास घेण्यास अधिक त्रास होतो. श्वसन त्रास हा रक्तगटावर आधारीत असल्याचे संशोधनात समोर आले आहे.

ओ पॉझिटीव्ह रक्तगट रुग्णांना कमी धोका
युरोपमधील विविध देशांतील १२० संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. यामध्ये इटली व स्पेनजवळील जवळपास ४००० हजार रुग्णांच्या जनुकांचा अभ्यास केला. यातील १९८० जणांना कोरोनाच्या संसर्गामुळे श्वसनसंबंधी त्रास झाला होता. तर, उर्वरीत जवळपास २००० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. यातील यामध्ये ए रक्तगटाच्या रुग्णांना श्वसनाचा अधिक त्रास झाला. तर, ओ पॉझिटीव्ह रुग्णांना कमी धोका असल्याचे संशोधनात समोर आले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या