वॉशिंग्टन: कोरोना विषाणू संसर्गामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचा अमेरिकेच्याही अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात विक्रमी ३ हजार अब्ज डॉलर इतकी विक्रमी तूट झाली आहे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या महाप्रचंड आकारमानामुळे जगभरात मोठी आर्थिक उलाढाल होत असते.
कोरोना संकटामुळे अमेरिकेत देशात लाखो लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. चालू अर्थसंकल्पात ऑक्टोबर ते ऑगस्ट या ११ महिन्यात ३ हजार अब्ज डॉलर इतकी तूट झाली आहे. याआधी विक्रमी तूट २००९ मध्ये नोंदवली गेली होती. तेव्हाची तूट १ हजार ३७० अब्ज डॉलर इतकी होती. तेव्हा २००८मधील जागतिक आर्थिक संकट जबाबदार होते. मात्र यंदा अर्थसंकल्पातील तूट ही याआधी पेक्षा दुप्पटीने अधिक आहे.
अमेरिकेचे २०२०चे आर्थिक वर्ष ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. अमेरिकन काँग्रेसच्या बजेट कार्यालयानुसार पूर्ण आर्थिक वर्षातील तूट ३ हजार ३०० अब्ज डॉलवर जाऊ शकते.ऑक्सफर्ड इकॉनॉमिस्टचे नॅसी वॅडन हुटन यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात ही तूट २०० अब्ज डॉलर असेल. ज्याने पूर्ण वर्षातील तूट ३.२ ट्रिलियन डॉलर इतकी होईल. ही गेल्या अर्थसंकल्पातील तूटीपेक्षा ९८४ अब्ज डॉलरने अधिक आहे.
लातूर : नीट परीक्षेला १,१९४ विद्यार्थ्यांची दांडी