24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोना लस; चीनकडून घातपाताची तयारी

कोरोना लस; चीनकडून घातपाताची तयारी

- अमेरिकेचा खळबळजनक आरोप - चीनने मागितला पुरावा

एकमत ऑनलाईन

वाशिंग्टन: वृत्तसंस्था
चीनने अमेरिकेचे सिनेट सदस्य रिक स्कॉट यांना आव्हान दिले असून त्यांनी केलेल्या आरोपांचा पुरावा मागितला आहे. रिक स्कॉट यांनी पाश्चिमात्य देश कोरोनावरील लस तयार करत असताना चीन अडथळा निर्माण करत असून, घातपाताचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रिक स्कॉट यांनी केला आहे.

जर त्यांनी चीन लस निर्माण करण्यात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे, तर मग त्यांना तसा पुरावा सादर करु द्यावा. यामध्ये लाज वाटावे असे काहीच नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकार परिषदेदरम्यान विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

Read More  एकाच दिवशी लातूर शहरातील १० व्यक्तींची कोरोनावर मात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसंच इतर अनेक वरिष्ठ अधिकारी, नेते वारंवार कोरोनाच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरत असून, जाहीरपणे आरोप करत आहेत. जगभरात आतापर्यंत ४० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून, चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनने मात्र वारंवार अमेरिकेचा आरोप फेटाळून लावलेला असून, आपण पहिल्यापासूनच याबाबत पारदर्शकता ठेवली असल्याचा दावा केला आहे.

अमेरिका लसीचा मोफत पुरवठा करेन?
रिक स्कॉट यांनी बीबीसी टीव्हीला मुलाखत देताना पुराव्यासंबंधी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. गुप्तचर विभागाकडून हा पुरावा आला तर जास्त योग्य होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेने सर्वात प्रथम लस तयार करावी अशी चीनची इच्छा नसल्याचे रिक स्कॉय यांचे म्हणणे असून, हुआ चुनयिंग यांनी मात्र ही कोणतीही स्पर्धा नसल्याचे सांगितले असून, अमेरिकेने लस तयार केल्यास जगाला मोफत पुरवठा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या