33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजगातील सर्वात खोल सोन्याच्या खाणीत कोरोना

जगातील सर्वात खोल सोन्याच्या खाणीत कोरोना

एकमत ऑनलाईन

जोहान्सबर्ग: वृत्तसंस्था
जगभरातील २०० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे. कोरोनाच्या संसर्गापासून जगातील सर्वात खोल सोन्याची खाणदेखील वाचू शकली नाही. या खाणीत काम करणा-या कामगारांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील पोनेन्ग सोन्याच्या खाणीतील कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या खाणीतील काम अनिश्चितकाळासाठी बंद करण्यात आले आहे. एंग्लोगोल्ड अशांती या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात एकाला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ६५० कर्मचा-यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १६४ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी अनेकांमध्ये लक्षण दिसून आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Read More  धामणगावातील युवकाने साकारली सॅनिटायझिंग मशिन

दरम्यान, मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. एक महिन्याच्या लॉकडाउनंतर मागील महिन्यातच खाण काम सुरू झाले होते. या कालावधीत सर्व सोन्याच्या खाणीदेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. मे महिन्याच्या सुरुवातीला कामगार संघटनांनी कोर्टात कामगार सुरक्षांबाबत दाखल केलेला खटला जिंकला होता. त्यानंतर सरकारने कामगारांना आवश्यक सुरक्षा उपकरणे देण्याबाबतचे निर्देश दिले होते.
पोनेन्ग सोन्याची खाण ही दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरातील दक्षिण-पश्चिम भागात आहे. या खाणीतील सोने काढण्याचे हक्क अँग्लोगोल्ड आशांती कंपनीला देण्यात आले आहेत. पृथ्वीपासून चार किमी अंतरावर ही खाण आहे. जगातील सर्वात खोल खाण म्हणून या खाणीची ओळख आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या