न्यूयॉर्क : कोरोनाने मागील दोन वर्षात हाहाकार माजवला. एकीकडे कोरोना कमी होत असल्याची चर्चा सुरू असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याचे चित्र समोर आले.
कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनी जगाची चिंता वाढवली आहे. विशेषत: अमेरिका आणि यूरोपमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटनी हाहाकार माजवला आहे. भारतातसुद्धा या व्हेरिएंटची अनेक प्रकरणे समोर येताना दिसत आहेत. यात बीए.५ हा खुप चर्चेत असलेला वेरिअंट आहे.
आता या व्हेरिएंटबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. इन्फेक्शननंतर बीए.५ काही आठवड्यानंतर दुस-यांदा पुन्हा संक्रमित करू शकतो. परिणामी एका महिन्यानंतर रूग्ण पुन्हा आजारी पडू शकतो.