26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनावर रामबाण उपाय मिळण्याची शक्यता नाही-डब्ल्यूएचओ

कोरोनावर रामबाण उपाय मिळण्याची शक्यता नाही-डब्ल्यूएचओ

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : कोरोना विषाणूवरील लसीचे प्रयोग जगभरात सुरू आहेत. लवकरच लस उपलब्ध होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. लसीची चाचणी तिस-या टप्यात आली आहेत. असे असले तरी सध्याच्या घडीला आणि पुढेही कोरोनावर रामबाण औषध मिळणे कठिण असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रॉस अधनोम घेब्रायसिस यांनी आज दि. ३ ऑगस्ट रोजी व्यक्त केले.

टेड्रॉस म्हणाले, ‘कोरोनावरील अनेक लसींची चाचणी तिस-या टप्यात आहे. आम्हाला आशा आहे की अनेक प्रभावशाली लसी लोकांना या संक्रमणापासून वाचवू शकतील. पण, असे असले तरी सध्याच्या घडीला कोरोनावर रामबाण असे औषध अजून तरी तयार झालेले नाही आणि भविष्यात तयार होणारही नाही. अल जझीरा या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार टेड्रॉस आणि जागतिक आरोग्य संघटनेचे आपात्कालीन प्रमुख माईक रेयान यांनी देशांना आरोग्य विषयक खबरदारी घेत मास्क घालणे, शारीरिक अंतर पाळणे, हात वरचेवर धुणे आणि चाचण्या करणे या गोष्टी तशाच सुरु ठेवण्याची विनंती केली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या जिनेव्हा येथील मुख्यालयातून व्हर्च्युअल पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, यावेळी टेड्रॉस यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, जॉन हापकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार सध्या जगभरात १ कोटी ८१ लाख २ हजार ६७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे ६ लाख ८९ हजार ९०८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Read More  स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दीनिमित्त वृक्षारोपन

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या