22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकोरोना मोजतेय अंतिम घटका

कोरोना मोजतेय अंतिम घटका

एकमत ऑनलाईन

जीनिव्हा : गेल्या दोन वर्षांपासून हैराण करून सोडलेल्या कोरोना महामारीचा अंत कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अखेर या प्रश्नावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस ए. गेब्रेयसस यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे. गेल्या आठवड्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार जगातून कोरोना महामारीचा अंत दिसू लागला आहे असे विधान टेड्रोस यांनी केले आहे. जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामारीचा अंत करण्यासाठी संपूर्ण जग कधीही चांगल्या स्थितीत नव्हते. अद्यापही आपण त्या स्थितीत नाही. मात्र, आता या महामारीचा शेवट दृष्टीक्षेपात आहे.

डॉ. टेड्रोस म्हणाले की, गेल्या आठवड्यात जगभरातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या मार्च २०२० नंतरच्या साथीच्या आजाराती सर्वात कमी आहे. त्यामुळे दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या जागतिक महामारीच्या उद्रेकात हे एक महत्त्वपूर्ण वळण असू शकते असे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जग सक्षम नसले तरी, आता कोरोनाचा अंत दिसू लागला आहे. यावेळी त्यांनी कोरोना महामारी आणि मॅरेथॉनमध्ये प्रयत्न करणा-या खेळाडूची तुलना करत या महामारीचा अंतिम रेषा आता जवळ आल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आता कठोर परिश्रम करण्याची आणि सीमा रेषा ओलांडण्याची वेळ आली आहे. यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वासही डॉ. टेड्रोस यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या आठवड्यात मृत्यूमध्ये २२% घसरण
युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालात गेल्या आठवड्यात कोरोना मृत्युंमध्ये २२ टक्के घट झाल्याचे म्हटले आहे. ही आकडेवारी जगात ११ हजार एवढी असून, नव्या बाधितांची संख्या जगभरात ३१ लाख आहे. ही आकडेवारी एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत २८ टक्क्यांनी कमी असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. कोरोनाची जगभरातील रूग्णसंख्या कमी जरी होत असली तरी, अनेक देशांमध्ये कोरोनाचे नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

ओमिक्रॉन, बीए५ व्हेरिएंटचे सर्वाधिक प्रकरणे
जागतिक आरोग्य संघनेने दिलेल्या एका अहवालात ओमिक्रॉन आणि बीए ५ च्या नव्या रूग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये जगातील सर्वात डेटाबेससह सामायिक केलेल्या सुमारे ९०% व्हायरसचे नमुने समाविष्ट आहेत. अलिकडच्या आठवड्यात युरोप, यू.एस. आणि इतरत्र नियामक प्राधिकरणाने बीए ५ मूळ व्हेरिएंट आणि त्यापासून नव्याने तयार होणा-या उपप्रकारांना नियंत्रित करणा-या ट्वीक लसींना मान्यता दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या