30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेसह १० देशात कोरोना संसर्ग उतरणीला

अमेरिकेसह १० देशात कोरोना संसर्ग उतरणीला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज आदल्यादिवशीपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून रुग्णालयांत ऑक्सिजन व बेडची कमतरता पडत आहे. मात्र महिनाभरापुर्वी कोरोनाच्या दुस-या लाटेने कहर केलेल्या अमेरिकेसह जगातील १० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग उतरणीला लागला आहे. एकुणच लसीकरणासह लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्याने हे साध्य झाल्याचे मत व्यक्त होत आहे.

रॉयटर्स व वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये ४७८६४ नवे रुग्ण आढळले. त्याच्या एक दिवसापुर्वी ही संख्या एा दिवसात ६५७११ इतकी होती. ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत ३७५३७ नवे बाधित आढळले होते. त्याच्या एक दिवस आधी ही संख्या एका दिवसात ६५५९२ इतकी होती. फ्रांसमध्ये गेल्या २४ तासांत ३४८९५ नवे रुग्ण आढळले, तर त्याच्या एक दिवसापुर्वी २४ तासांत ४३२८४ नवे रुग्ण आढळले होते.रशियामध्ये गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांची संख्या आदल्या दिवशी एवढीच होती. शनिवारी दिवसभरात ८७०४ तर रविवारी दिवसभरात ८७०२ नवे रुग्ण रशियात आढळले आहेत. इंग्लंडमध्ये गेल्या २४ तासांत केवळ १७०३ नवे रुग्ण आढळले आहेत. तुर्कीतही मामुली घट आढळून आली आहे.

लाटा येतीलच पण नियम पाळणेच उपाय
एकुणच कोरोनाच्या या सर्व देशात आलेल्या २ लाटांवरुन तेथील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ कोरोना संसर्गाचे विश्लेषण करीत आहेत. सध्या काही देशात तिसरी लाटही आल्याचे बोलले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर कोरोना लवकर पाठ सोडणार नसून त्याच्या ठराविक अंतराने लाटा येतच राहणार आहेत. मात्र त्याची साखळी तोडण्यासाठी लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे व सरकारने लसीकरणाचा वेग वाढविणे हे उपायच जास्त प्रभावी ठरणार आहेत.

विराट युद्धनौका भंगारात जाणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या