26.4 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home आंतरराष्ट्रीय कोरोना भारतातून जगभरात पसरला

कोरोना भारतातून जगभरात पसरला

एकमत ऑनलाईन

बीजिंग : काही महिन्यापूर्वी कोरोना विषाणूने जगभरात थैमान घालण्यास सुरूवात केली. अद्यापही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात कायम आहे. अनेक देश यावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. परंतु अशा परिस्थितीतही चीनने आता भारताबाबत अफवा पसरवण्यास सुरूवात केली आहे. वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यापूर्वी इटलीसोबतच जगाच्या इतर भागात कोरोना विषाणू पसरला असल्याचा दावा चीनने केला होता. परंतु आता कोरोना विषाणू सर्वप्रथम भारतातूच पसरला, असा दावा चीनच्या वैज्ञानिकांनी केला. परंतु चीनचा हा दावा काही तज्ज्ञांनी खोडून काढला आहे.

चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या वैज्ञानिकांच्या एका टीमने कोरोना विषाणू २०१९ च्या उन्हाळ्याच्या कालावधीत भारतात निर्माण झाल्याचा दावा केला आहे. तसेच, प्राण्यांपासून दुषित पाण्याच्या माध्यमातून या विषाणूने मानवात प्रवेश केला. परंतु त्यानंतर तो विषाणू वुहानमध्ये पोहोचल्यानंतर कोरोना विषाणूची पहिल्यांदा ओळख पटवण्यात आली. आपल्या सर्वेक्षणात कोरोना विषाणूचा स्त्रोत माहित करून घेण्यासाठी चीनच्या टीमने फिलोजेनेटिक विश्लेषणाचा आधार घेतला आहे.

चीनच्या वैज्ञानिकांनी या पद्धतीचा वापर करून वुहानमध्ये सापडलेला कोरोना विषाणू खरा नसल्याचे म्हटले. तपासामध्ये हा विषाणू बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, झेक रिपब्लिक, रशिया अथवा सर्बियामध्ये तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच, भारत आणि बांगलादेशात कमी म्युटेशनवाले नमूने सापडले आहेत आणि हे देश चीनच्या शेजारी देश आहेत़ त्यामुळे याचे संक्रमण त्याच ठिकाणाहून झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच, जुलै किंवा ऑगस्ट २०१९ मध्ये पहिल्यांदा या विषाणूचा प्रसार झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

जनावरांमधून मानवामध्ये कोरोना विषाणू पसरण्याचे कारण अधिक गरमी हे आहे असा अनुमानही त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच, भारतातील आरोग्य सेवा आणि तरूणांच्या मोठ्या संख्येमुळे अनेक महिने हा आजार ओळखू न येता असाच पसरत राहिला, असा दावाही चिनी वैज्ञानिकांनी केला आहे. परंतु चिनी वैज्ञानिकांचा हा दावा अन्य वैज्ञानिकांनी खोडून काढला आहे. ब्रिटनमधील ग्लासगो विद्यापीठातील तज्ज्ञ डेव्हिड रॉबर्ट्सन यांनी डेली मेलशी बोलताना चीनचा हा दावा दोषयुक्त असल्याचं म्हटलं. तसंच त्यांच्या दाव्याची खात्रीही नसल्याचेही त्यांनी म्हटले. यापूर्वी चीनने कोणत्याही प्रकारच्या पुराव्यांशिवाय अन्य देशांवर आरोप केले होते. सध्या जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक कोरोना विषाणूचा मुख्य स्रोत कोणता आहे, याचा तपास करण्यासाठी चीनमध्येही आहे.

हिमाचलमध्ये विनामास्क थेट तुरुंगवास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या