Tuesday, September 26, 2023

इजिप्तमध्ये कोरोना टेस्ट करणारा रोबो

काहिरा : इजिप्तमध्ये कोरोनासाठी करावयाच्या चाचण्यांसाठी चक्क रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. हुबेहुब माणसासारखा दिसणाºया या रोबोला सीरा -०३ असे नाव संशोधकाने दिले आहे. रेस्टॉरंटमध्ये चहा कॉफी बनवून तो ग्राहकांना देणारा, तर कधी किचकट शस्त्रक्रिया सोप्या करून माणसाला जीवदान देणारा रोबो अशा अनेक बातम्या वाचण्यात येत असतात. मात्र इजिप्तमध्ये असाच मानवाला उपयोगी ठरणारा एक रोबो बनविला आहे. रोबोचे वैशिष्ठय म्हणजे त्याचा चेहरा आणि हात माणसासारखेच आहेत. तो रक्त तपासणी, इसीजी ही कामेही अगदी सफाईदारपणे करतो. आता तो कोरोना काळात रुग्णांच्या मदतीला येण्याच्या तयारीत आहे.

सर्व वैद्यकीय चाचण्या करण्याची क्षमता
रोबो कोविड १९ ची चाचणी करू शकतो. इतकेच नाही तर शरीराचे तापमानही मोजतो आणि जर मास्क घातले नसेल तर मास्क घालण्याच्या सूचनाही करतो. कोविड टेस्टव्यतिरिक्त इसीजी, रक्ततपासणी आणि एक्सरे काढण्याचे कामही त्याच्याकडून केले जाते. या टेस्टचा अहवाल रोबोत बसविण्यात आलेल्या स्क्रिनवर पाहता येतो.

रुग्ण घाबरु नयेत म्हणून मानवासारखी रचना
रोबोला इजिप्तच्या उत्तरेकडील काहिरा येथील एका खासगी रुग्णालयात बनविण्यात आले आहे. रोबोची निर्मिती मेहमूद अल कौमी यांनी केली असून हा रोबो कोरोना आटोक्यात आणण्यास मदत करू शकेल असे त्यांचे म्हणणे आहे. रोबोला पाहून कुणीही घाबरू नये म्हणून याची रचनाच एखाद्या मानवी देहासारखी करण्यात आली आहे. सध्या काहिरा येथील एका रुग्णालयात या रोबोकडून शरीराचे तापमान तपासण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच हा रोबो कोरोनाची चाचणी करण्यास फायदेशीर ठरू शकेल, असे रुग्णालयाचे मुख्य अबु बक्र अल मिही यांचे म्हणणे आहे.

रिमोटच्या सहाय्याने दुरुनच नियंत्रण
बँक, विमानतळ, रेल्वे स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी या रोबोला तपासणीसाठी आपण ठेवू शकतो. रिमोटच्या सहाय्याने दूरवरून एकच व्यक्ती या रोबोला हाताळू शकते त्यामुळे कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी मदत होऊ शकते, असे संशोधकाचे म्हणणे आहे.

लस घेणार नाही: बोलसोनारो

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या