24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनकडून नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस

चीनकडून नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस

एकमत ऑनलाईन

बीजिंग : कोरोना विषाणूंचा खात्मा करणारी लस कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. भारतात तर सध्या कोरोनाबाधितांचा रोज नवा विक्रमी आकडा नोंदवला जात आहे. अशात चीनमधून चांगली बातमी असून चीनने नेझल स्प्रेच्या माध्यमातून दिली जाणारी लस विकसित केल्याचे वृत्त आहे.

लसीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाली असून नोव्हेंबरपर्यंत या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीची सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी जवळपास १०० लोकांना सहभागी करून घेणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग, झीमान युनिव्हर्सिटी आणि बिजिंग, वातांय बायोलॉजिकल फार्मसीमधील शास्त्रज्ञांकडून ही लस तयार केली आहे. चीनच्या नॅशनल मेडिकल प्रोडक्ट्स एडमिनिस्ट्रेशनकडून या लसीला परवानगी दिली आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे मायक्रोबायोलॉजिस्ट युयेन याँग यांनी लसीची माहिती दिली. लसीमुळे विषाणुला प्रवेशमार्गात म्हणजेच नाकातून शरीरात जाण्यापासून रोखता येऊ शकते. लसीमुळे कोरोना विषाणूविरोधी अ‍ँटीबॉडी विकसित करण्यास मदत होईल. या लसीच्या लसीकरणासाठी मोठी खबरदारी घेतली जाणार आहे. कोरोना विषाणू आणि इन्फ्लुएंजा विषाणूपासून बचाव करण्यासाठी ही लस परिणामकारक ठरेल. या नाकाद्वारे दिल्या जात असलेल्या लसीच्या तिन्ही चाचण्या पूर्ण करण्यासाठी जवळपास एक वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे याँग यांनी सांगितले.

अशक्त अर्थव्यवस्थेला हवे ‘सरकारी टॉनिक’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या