22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeआंतरराष्ट्रीयवटवाघुळांमध्ये ७० वर्षांपासून कोरोना व्हायरस

वटवाघुळांमध्ये ७० वर्षांपासून कोरोना व्हायरस

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला असून संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या विषाणूवर संशोधन सुरू आहे. कोरोनासंदर्भात नवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या संसर्गाचा संबंध वटवाघुळांशी लावण्यात येत असून, त्याबाबतही संशोधन सुरू आहे. वटवाघुळांमध्ये कोरोना विषाणू हा जवळपास ४० ते ७० वर्षांपासून असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.

पेन्सिलवेनिया स्टेट यूनिव्हर्सिटीचे संशोधक मेसीज बोनी यांनी म्हटले की, कोरोना विषाणू हा हॉर्सशू या वटवाघुळाच्या प्रजातीत आढळला आहे. विशेष म्हणजे अनेक दशकांपासून तो या वटवाघुळांमध्ये पसरत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नव्हती. संशोधकांनुसार, सध्या जो कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत आहे, त्याचे मूळ विषाणू वटवाघुळांमध्ये ४० ते ७० वर्षांपासून अस्तित्वात आहेत.

वटवाघुळांमध्ये इतरही विषाणू असू शकतात. यामुळे इतर संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याचा संशोधक मेसीज बोनी यांनी सांगितले. कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असाही दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यावरच या संशोधनातून प्रश्न उपस्थित केले आहेत.

संसर्ग माणसापर्यंत कसा आला, संशोधन सुरूच
ग्लासगो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डेविड रॉबर्टसन यांनी सांगितले की, कोरोना पसरवणारा विषाणू हा वटवाघुळांमध्ये असलेल्या विषाणूशी मिळता जुळता आहे. अनेक वर्षांपूर्वी हा विषाणू आपल्या मूळ विषाणूपासून वेगळा झाला. या विषाणूचा संसर्ग माणसापर्यंत कसा आला, हे आपल्याला जाणून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूची उत्क्रांती समजून घेण्याची गरज
सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूची उत्क्रांती समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्य अधिका-यांना संसर्ग वाहक असलेल्या प्राण्यांना वेगळे करणे सोपे जाईल. त्यामुळे भविष्यातील संकटाची तीव्रता कमी करता येऊ शकते, असे पेन्सिलवेनिया स्टेट यूनिव्हर्सिटीचे संशोधक मेसीज बोनी मेसीज बोनी यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या