27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोना विषाणूचा वुहानमध्ये पुन्हा कहर

कोरोना विषाणूचा वुहानमध्ये पुन्हा कहर

एकमत ऑनलाईन

बीजिंग : कोरोनाचा उगम झालेल्या चीनच्या वुहानमध्ये पुन्हा फैलाव सुरु झाला असून, वुहानमध्ये गेल्या काही दिवासात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचे संकट पाहता प्रशासनाने चाचण्यावर भर दिला आहे. वुहानमधील १.२ कोटी लोकसंख्येपैकी १.१ कोटी नागरिकांची चाचणी झाली असल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले आहे. चार दिवसात वुहानमध्ये ९० टक्के लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण समोर आले होते. त्यानंतर करोनाचा संपूर्ण जगात फैलाव झाला.

हुबेई प्रातांत ४७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ३१ प्रकरणे संसर्गजन्य आहे. वुहानमध्ये ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६४ जणांमध्ये कोणतीच लक्षणे नाही. या सर्वांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. चीनमध्ये शुक्रवारी १३९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा एकूण आकडा ९३ हजार ६०५ इतका झाला आहे. तर कोरोनामुळे ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ४४४ जणांवर उपचार सुरु असून ३९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

भारतात ४९१ रुग्णांचा मृत्यू
देशभरात मागील २४ तासात ४३ हजार ९१० रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ३९ हजार ७० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ४९१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. शिवाय, तिस-या लाटेची भीती देखील तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. अद्यापही रोज मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, देशात मागील काही दिवस सलग दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्यी ही कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली होती. त्यानंतर आता कालपासून पुन्हा एकदा देशभरात रोज आढळून येणा-या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे.

चीनची कोरोना लस अकार्यक्षम?
चीनमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने चीन निर्मित लसीवर प्रश्नचिन्हें उपस्थित केले जात आहे. डेल्टा व्हेरिएंटवर ही लस अकार्यक्षम असल्याचे बोलले जात आहे. त्यात किती जण लस घेऊनही संक्रमित झाले आहेत, याबाबतची माहिती नाही. दुसरीकडे दक्षिण-पूर्व आशियाई देशांनी चीनची लस घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

 

लातुरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या