बीजिंग : चीनमधील एका मोठ्या शहरामध्ये ५० लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. या संपूर्ण भागामध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांगजवळील काशगरमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहे. या भागामध्ये लक्षणं न दाखवणारे अनेक रुग्ण आढळून येत असल्याने एवढ्या मोठ्याप्रमाणात चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून १३७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.झिजियांग मधील आरोग्य अधिका-यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचे सांगितले आहे. एका कापड कारखान्यातील १७ वर्षीय तरुणी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या मुलीला कोरोनाचा संसर्ग कसा झाला, यासंदर्भातील तपास आरोग्य अधिकारी करत असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
एका दिवसात २८ लाख चाचण्या
रविवारी दुपारपर्यंत चीनमधील या भागातील २८ लाखांहून अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारपर्यंत या भागातील ४७ लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील अशी अपेक्षा सरकारी अधिका-यांना आहे.
प्रत्येकाची चाचणी करण्याचा निर्णय
प्रत्येक नागरिकाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागामध्ये प्रामुख्याने एक कोटीहून अधिक उइगर मुस्लीम राहतात. या भागामध्ये मोठ्याप्रमाणात उइगर मुस्लिमांना वेगवेगळ्या छावण्यांमध्ये बंद करुन ठेवण्यात आल्याचा अमेरिकन परराष्ट्र विभागाचा अंदाज आहे.
सत्तांतरासाठी हीच योग्य वेळ – सोनिया गांधी यांचे बिहारी जनतेला आवाहन