26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

एकमत ऑनलाईन

लंडन : कोरोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कोरोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील १०० हून अधिक प्रयोग शाळांमध्ये संशोधन केले जात आहे. याचदरम्यान आता कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यावर मात करुन पूर्णपणे ब-या झालेल्या रुग्णांच्या मेंदूवर होणा-या परिणासंदर्भात एक अभ्यास करण्यात आला.

या अभ्यासामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशोधनाशी संबंधित वैज्ञानिकांनी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या मेंदूवर या विषाणूचा खूपच वाईट परिणाम होत असल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणू रुग्णाच्या मेंदूवर एवढा मोठ्या प्रमाणात परिणाम करतो की मेंदूचे वय दहा वर्षांनी वाढते. म्हणजेच मेंदूच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन तो अपेक्षित वयोमानापेक्षा लवकर अकार्यक्षम होण्याची शक्यता असते.

लंडनमधील इंपीरियल कॉलेजमधील डॉक्टर अ‍ॅडम हॅम्पशायर यांच्या नेतृत्वाखाली ८४ हजारहून अधिक रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये काही गंभीर प्रकरणांमध्ये कोरोना विषाणूचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये एखादी गोष्ट समजून घेण्याची आणि काम करण्याची शक्ती आणि क्षमता कमी होते, असे अभ्यासात म्हटले आहे.

कॉग्निटीव्ह टेस्ट पद्धतीने केले संशोधन
कॉग्निटीव्ह टेस्ट पद्धतीने हा अभ्यास करण्यात आला आहे. कोरोनामधून ब-या झालेल्या व्यक्तींची कॉग्निटीव्ह टेस्ट घेण्यात आली आणि त्यामधून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे अंतिम अहवाल तयार करण्यात आला. एकाद्या व्यक्तीचा मेंदू किती चांगल्याप्रकारे काम करतो हे तपासण्यासाठी कॉग्निटीव्ह टेस्ट करण्यात येते. यामध्ये लोकांना कोडी घातली जातात.

मानवी मेंदूवर मोठा परिणाम
या अभ्यासामधून कोरोनाच्या साथीचा मानवाच्या मेंदूवरही मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. याच अभ्यासामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांबरोबरच जे यामधून पुर्णपणे बरे झाले आहेत. त्यांच्या मेंदूवरही गंभीर परिणाम झाला आहे. कोरोनाचे एकही लक्षण नसलेल्या मात्र संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मेंदूवरही परिणाम झाल्याचा दावा या अभ्यास करण्यात आला आहे.

८४ हजार २८५ जणांचा चाचण्यांचा अभ्यास
सामान्यपणे अल्जाइमर म्हणजेच विसरभोळेपणाशी संबंधित आजाराबद्दल जाणून घेण्यासाठी ही चाचणी केली जाते. कोरोनाचा परिणाम जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये ८४ हजार २८५ जणांचा चाचण्यांचा अभ्यास करण्यात आला. ग्रेट ब्रिटिश इंटेलिजेंस टेस्ट नावाअंतर्गत घेण्यात येणा-या चाचण्यांमधील प्रश्न या रुग्णांना विचारण्यात आले होते. या सर्व उत्तरांचा एकत्रित पणे अभ्यास करुन हा अहवाल मेडरिक्सीव्ह या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

किल्लारी साखर कारखाना आपणच सुरू करणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या