36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयउत्तर कोरियात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

उत्तर कोरियात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर कोरिया मध्ये पहिल्या कोविड -१९ चे प्रकरण आढळून आला आहे. देशाच्या राज्य माध्यमांनी याचे वर्णन ‘गंभीर राष्ट्रीय आपत्कालीन घटना’ असे केले. उत्तर कोरियातील कोरोना विषाणू जगासमोर येऊन दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे, मात्र आतापर्यंत उत्तर कोरियाने आपल्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती माध्यमांना दिली नव्हती. मात्र आता अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे की कोविडची नवीन नोंदलेली प्रकरणे विषाणूच्या धोकादायक ओमिक्रॉन प्रकाराशी जोडली गेली आहेत.
अधिकृत वृत्तानुसार गुरुवारी राजधानी प्योंगयांगमध्ये अनेक लोकांना ओमिक्रॉन व्हेरियंटने संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशात कोविड प्रतिबंधात्मक उपाय कडक करण्यावर आता भर दिला आहे. किमने सत्ताधारी कोरियन वर्कर्स पार्टीच्या पॉलिटब्युरोची बैठक बोलावली आहे आणि जिथे सदस्यांनी अँटी-व्हायरस उपाय वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे. बैठकीदरम्यान, किम यांनी अधिका-यांना कोविडचा प्रसार वाढू न देण्यास आणि संसर्गाचे स्रोत लवकरात लवकर नष्ट करण्यास सांगितले आहे. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे आणि अधिका-यांनी देशव्यापी लॉकडाऊन लागू सुनावले आहे.

राज्य माध्यमांनी सांगितले की, ‘देशात सर्वात मोठी आणीबाणी झाल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी २०२० पासून गेली दोन वर्षे आणि तीन महिन्यांत देश सुरक्षित ठेवण्यात आला होता, मात्र आता त्यात घुसखोरी झालेली आहे. कोविड-१९ मुळे किती लोकांना संसर्ग झाला आहे याची माहिती अध्याप दिलेली नाही. उत्तर कोरियामध्ये महामारीच्या सुरुवातीपासूनच देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कोविड धोरण लागू केले होते. देशातील मर्यादित आरोग्य सुविधा आणि जागतिक स्तरावर एकटेपणामुळे किम जोंगचिंतेत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

किम यांना वाटते की या दोन कारणांमुळे कोविडचा देशावर खूप घातक परिणाम उद्भवू शकतो. महामारी सुरू झाल्यानंतर उत्तर कोरियातील लोकांना आपत्कालीन क्वारंटाईन पद्धतीमध्ये ठेवावे लागले होते. याअंतर्गत लोकांना बाहेर पडू दिले जात नाही आणि नियम मोडणा-यांवर कडक कारवाई केली जात होती. आतापर्यंत उत्तर कोरियाने कोरोनावर ठेवलेल्या नियंत्रणाचे खुप मोठे यश आल्याचे म्हटले आहे. मात्र, आता पहिल्या कोविड पेशंटची बाब मान्य करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या