25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपाकिस्तानमध्ये कोरोनाचा कहर सुरु

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा कहर सुरु

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : भारताचा शेजारी पाकिस्तानमध्ये ही कोरोनाने कहर माजवण्यास सुरुवात केली आहे. मागील २४ तासांमध्ये पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसांतील मृतांचा हा दोन वर्षातील सर्वाधिक आकडा आहे. पाकिस्तानमध्ये कोविड प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्कर तैनात करण्याची शिफारस केली आहे.

पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत १६ हजार ९९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ९० हजारांहून अधिक झाली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा दोन वर्षातील सर्वाधिक असून मागील वर्षी २० जून रोजी एकाच दिवसात १५३ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोविड प्रोटोकॉल लागू करण्यासाठी लष्कराने पोलिसांची मदत करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनाला ज्या ठिकाणी सुरक्षा दलाची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात यावे, असे त्यांनी लष्कराला सांगितले आहे.

 

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयचे छापे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या