26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनाचे दुसरे वर्ष पहिल्यापेक्षा भयानक असेल

कोरोनाचे दुसरे वर्ष पहिल्यापेक्षा भयानक असेल

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : गेल्या वर्षभरात जगभरात कोरोनाने कहर माजवल्यानंतर आता कुठे जगातल्या काही देशांमध्ये परिस्थिती सामान्य होण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. भारतासारख्या काही देशांमध्ये कोरोनाच्या दुसºया लाटेचा जबरदस्त तडाखा बसला आहे. जगभरात कोरोनावर संशोधित झालेल्या लसींमुळे आख्ख्या जगाने कोरोनाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने मात्र वेगळाच इशारा दिला आहे.

कोविड-१९ने आत्तापर्यंत जगभरात ३३ लाखाहून जास्त जीव घेतले आहेत. आपण आता कोरोनाच्या दुसºया वर्षात आहोत. पण हे दुसरे वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयानक असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकू, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे.

लसीचा पुरवठा हे प्रमुख आव्हान
जगभरातल्या कोरोनाच्या संकटाबाबत डॉ. टेड्रॉस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगभरातल्या करोनाच्या परिस्थितीसोबतच चालू वर्षात कोरोनाचा नि:पात करण्यासाठी कशा पद्धतीने पावले उचलणे गरजेचे आहे, याविषयी जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका मांडली. या काळामध्ये लसीचा पुरवठा हे एक सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे.

मात्र, जगातील काही प्रमुख लस उत्पादक देश यासंदर्भात इतर देशांना मदतीचे धोरण अंगीकारत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. काही देशांनी लसींचा साठा इतर देशांना पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच काही लस उत्पादक कंपन्यांनी लसीचा फॉर्म्युला देण्याचीही तयारी दर्शवली आहे, असे ते म्हणाले.

कोविड परिस्थितीमुळे आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांबाबत ना. श्री. अमित देशमुख यांचे फेरप्रस्तावाचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या