21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनकडून कोरोनावर लपवाछपवी; विषाणू संशोधनाचा ऑनलाइन डेटा उडवला

चीनकडून कोरोनावर लपवाछपवी; विषाणू संशोधनाचा ऑनलाइन डेटा उडवला

एकमत ऑनलाईन

वुहान : संपूर्ण जगभरात कोरोना फैलाव होण्यास आता जवळपास एक वर्ष झाले आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचा विषाणूचा उगम कसा झाला, कुठून फैलावला याबाबतची ठोस माहिती समोर आली नाही. कोरोनाची माहिती लपवण्याबाबत चीनवर सातत्याने आरोप करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या मुद्यावर चीन संशयाच्या भोव-यात अडकला असताना आणखी एक दावा करण्यात येत आहे. वुहान येथील प्रयोगशाळेशी निगडीत असलेल्या महत्त्वाचा ऑनलाइन डेटा डिलीट करण्यात आला आहे.

वुहान इन्स्टिटयूट ऑफ वायरॉलजीमध्ये करण्यात येणा-या संशोधनाशी निगडीत असलेली जवळपास १०० पानांची माहिती डिलीट करण्यात आली आहे. नॅशनल नॅचरल सायन्स फाउंडेशन ऑफ चायनाने जवळपास ३०० हून अधिक संशोधन अभ्यास प्रकाशित केले होते. यामध्ये प्राण्यांपासून मानवांमध्ये फैलावणा-या आजारांबाबत संशोधन करण्यात आले. आता हे संशोधन, अभ्यास आता उपलब्ध नाही. त्यामुळेच चीनवर कोरोनाचा उगमस्थान लपवण्याचा आरोप पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

वटवाघळांशी निगडीत अभ्यास डिलीट
एनएसएफसीच्या ऑनलाइन संशोधन, अभ्यासाचा डेटा डिलीट करण्यात आला आहे. त्यामध्ये वुहानची वायरॉलजिस्ट शी झेंगलीच्या संशोधनाचा समावेश आहे. झेंगली यांना बॅटवुमन म्हणून ओळखले जाते. वटवाघळांच्या गुहेत जाऊन त्यांनी अनेकदा नमुने जमा केले आहेत. त्यांचे संशोधनही डिलीट करण्यात आले आहे. हे संशोधन वटवाघळांपासून दुस-या प्राण्यांमध्ये सार्सच्या कोरोना विषाणूच्या धोक्यावर अभ्यास करण्यात आला होता.

 

प्रताप सरनाईक यांची १०० कोटींची जमीन ईडीकडून जप्त : सोमय्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या