23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकच्चे तेल नीचांकी पातळीवर

कच्चे तेल नीचांकी पातळीवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांची अडचण दूर झाली आहे. मात्र, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लोकांना दिलासा मिळालेला नाही. इंडियन ऑइलसह सर्व कंपन्यांनी पेट्रोलवरील तोटा भरून काढला आहे. परंतु, डिझेलमध्ये अजूनही तोटा आहे. ब्रेंट क्रूड गुरुवारी ९४.९१ प्रति बॅरल डॉलर होता.

मंदीच्या भीतीने एक दिवस आधी ९१.५१ प्रति बॅरल डॉलरवर पोहोचला होता. भारत सध्या गरजेच्या ८९ टक्के तेल आयात करतो, असे अधिकाऱ्यांने सांगितले. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी साडेचार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरात वाढ केलेली नाही. तर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.

एकेकाळी तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर १४ ते १८ रुपये आणि डिझेलवर २० ते २५ रुपये तोटा होत होता. मात्र, आता कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तेल कंपन्यांचा तोटा कमी झाला आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्यामुळे तेल कंपन्यांना १४ ते १८ हजार कोटींचा फटका बसला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या