22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयधोका टळला ! अखेर चीनचे ते रॉकेट हिंदी महासागरात कोसळले

धोका टळला ! अखेर चीनचे ते रॉकेट हिंदी महासागरात कोसळले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : चीनचे लाँग मार्च ५ ई हे रॉकेट नियंत्रण सुटल्याने जगात कोठेही कोसळेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. कोरोनाच्या रुपाने जगासमोर मोठे संकट निर्माण करणा-या चीनच्या या नव्या उपद्यावापामुळे संपुर्ण जगच संकटात कोसळले होते. अखेर रविवारी हा धोका टळला. महाकाय रॉकेटचे अवशेष हिंदी महासागरात कोसळले.

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्या रॉकेटचे बरेचसे भाग नष्ट झाले, अशी माहिती चीनी माध्यमांकडून देण्यात आली आहे.अवशेष मालदीव जवळच्या हिंदी महासागरात कोसळल्याचे सांगतानाच मालदीव बेटांच्या पश्चिमेला या अवशेषांमुळे महासागरात होणा-या परिणामांबद्दलही माहिती दिली आहे.

२९ एप्रिल रोजी या लाँग मार्च ५ इ रॉकेटचा स्फोट झाल्यानंतर काही लोकांनी या अवशेषांना आकाशातून पडताना पुसटसे पाहिल्याचेही सांगितले जात होते. मात्र, चीनच्या अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात आल्यावर या रॉकेटचे बरेचसे अवशेष जळून खाक झाले आहेत. चीनी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, या रॉकेटने सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. नंतर काही वेळातच ते हिंदी महासागरात कोसळले.

यूपीत १७ मे पर्यंत निर्बंध लागू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या