25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपुढील काही महिने धोक्याचे - डब्ल्यूएचओ इशारा

पुढील काही महिने धोक्याचे – डब्ल्यूएचओ इशारा

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जगभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही परिस्थितीला गांभीर्याने घेतले जाताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. काही देशांमध्ये निष्काळजीपणामुळे कोरोनाची भयानक परिस्थितीत निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी भयानक होण्याची शक्यता आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहॉलम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण जगाला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जास्त सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला. कोरोना संकटामुळे संपूर्ण जग, विशेषत: उत्तर गोलार्ध गंभीर टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अनेक देशात कोरोना प्रचंड फोफावत आहे. त्यामुळे पुढचे काही महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे टेड्रोस म्हणाले आहेत.

टेड्रोस एडहॉलम यांनी जगभरातील सर्व देशाच्या नेत्यांना कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करण्याचं आवाहन केले आहे. कारण आता पुन्हा शाळा, महाविद्यालये, कंपन्या बंद होऊ नये आणि कोरोनामुळे आणखी जास्त लोकांचा बळी जाऊ नये, यासाठी टेड्रोस यांनी योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जे सांगितले होते़ तेच पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे, असे म्हणत टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली.

नवे रुग्ण झपाट्याने वाढतायेत
अनेक देशांमध्ये अद्यापही कोरोना संक्रमनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे मोठे आहे. काही देशांमध्ये ऑक्टोबर महिन्यात तर रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आहेत. ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही महिने जास्त चिंताजनक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

सर्वच देशांनी चाचण्या वाढवाव्यात
कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी टेस्टची क्षमता वाढवावी, जेणेकरुण बाधितांना तातडीने उपचार मिळेल. याशिवाय त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ ओढावणार नाही, असेदेखील जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे़

निवडून आल्यास मोफत लस – जो बायडेन यांचे अमेरिकन नागरिकांना आश्वासन

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या