36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजगभरात कोरोना चाचण्यात घट; कोरोना ‘सायलंट किलर’ होण्याची शास्त्रज्ञांना भीती

जगभरात कोरोना चाचण्यात घट; कोरोना ‘सायलंट किलर’ होण्याची शास्त्रज्ञांना भीती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना संकटादरम्यान कोरोना चाचण्या घटल्यामुळे शास्त्रज्ञांची च्ािंता वाढवली आहे. जगभरात कोरोना चाचण्या ७० ते ९० टक्के कमी झाल्याचे म्हटले जात आहे. यामुळे कोरोना ‘सायलंट किलर’ होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांना वाटते. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, यासोबत कोरोना चाचण्यामध्ये कमतरता दिसून येत आहे. ही शास्त्रज्ञांसाठी चिंता वाढवण्याची बाब आहे. दरम्यान, जर टेस्ंिटग कमी झाली तर कोरोना महामारीची सध्याची स्थिती काय आहे, हे शास्त्रज्ञ ट्रॅक करू शकणार नाहीत. तसेच, कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट, नवीन व्हेरिएंट आणि म्युटेंटची माहिती सुद्धा गोळा करता येणार नाही.

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुस-या तिमाहीत कोरोना चाचण्या ७० ते ९० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. तसेच, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करायला हवी होती, मात्र याच्या उलट झाल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, आपल्याला जेवढी चाचण्या करायच्या होत्या, त्याच्या आसपास सुद्धा आपण केल्या नाहीत, असे डॉ. कृष्णा उदय कुमार म्हणाले. दरम्यान, कृष्णा उदय कुमार हे ड्युक युनिव्हर्सिटीमध्ये ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरचे संचालक आहेत. दुसरीकडे, अमेरिकेत आढळणा-या एकूण प्रकरणांपैकी १३ टक्के प्रकरणे नोंदवली जात आहेत, असे युनिव्हर्सिटी ऑफ वॉश्ािंग्टनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

अनेक देशांमध्ये कोरोना चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत, कारण त्या देशांमध्ये कोरोना उपचारांवरील औषधांची कमतरता आहे. तसेच, घरांमध्ये होणा-या चाचण्यासुद्धा शास्त्रज्ञांच्या निशाण्यावर आहेत, कारण ट्रॅकिंग सिस्टिममध्ये त्यासंदर्भात कोणताच रेकॉर्ड नाही. यामुळे अशा लोकांची स्थिती दृष्टीहीन व्यक्तीसारखी झाली आहे आणि त्यांना व्हायरससोबत नवीन काय होत आहे, हे समजत नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या