29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home आंतरराष्ट्रीय जन्मदर घटल्याने चीनी अर्थव्यवस्थेला फटका

जन्मदर घटल्याने चीनी अर्थव्यवस्थेला फटका

एकमत ऑनलाईन

बीजिंग : चीनमधील हम दो हमारा एक या धोरणाला काही वर्षांपूर्वी शिथिल करण्यात आले. मात्र त्यानंतरही चीनमधील जन्मदर वाढत नसल्याने आता जन्मदरासंदर्भातील नियमांमध्ये आणखीन सूट देण्याचा विचार चीनमधील प्रशासनाकडून केला जात आहे. चीनमध्ये मागील अनेक दशकांपासून आपल्या वाढत्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी किमान साधनांचा वापर देशातील जनतेकडून केला जावा या उद्देशाने जन्मदरासंदर्भातील कठोर कायदे केले होते. मात्र आता जन्मदर इतका कमी झाला आहे की या कायद्यामध्ये सूट दिल्यानंतरही जन्मदरात वाढ झालेली नाही. त्यामुळेच आता आर्थिक विकास आणि सामाजिक स्थैर्य या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्याचे लक्षात घेत या कायद्यामध्ये अधिक सूट देण्याचा विचार चीनमध्ये सुरु आहे़

चीनमधील राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थापनाने जारी केलेल्या एका वक्तव्यामध्ये जन्मदर वाढण्यासाठी सध्याच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या नवीन धोरणानुसार सर्वात आधी देशाच्या पूर्वेकडील औद्योगिक क्षेत्रातील भागांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे असे चीन सरकारने स्पष्ट केले आहे. ईशान्य चीनमधील अनेक प्रांत हे औद्योगिक पट्ट्यात येतात. या ठिकाणी जन्मदर कमालीचा घटला आहे.

जन्मदर १५ टक्क्यांनी घसरली
२०१९ मध्ये तर जन्मदर हा १९४९ च्या जन्मदराइतका पडला होता. २०२० मध्येही चीनमधील जन्मदरात घसरण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. २०२० मध्ये जन्मदर १५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. २०२० मधील सविस्तर अहवाल एप्रिल महिन्यामध्ये प्रकाशित केला जणार आहे.

 

ज्या दिवशी इंधनदरवाढ नाही तो ‘अच्छा दिन’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या