24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयजगभरातील ७५ टक्के नागरिकांना डेल्टाची लागण

जगभरातील ७५ टक्के नागरिकांना डेल्टाची लागण

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क/नवी दिल्ली : मागील चार आठवड्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ७५ टक्के जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यामध्ये भारतासह, चीन, रशिया, इस्राईल, ब्रिटन या देशांचा समावेश असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले. कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत १२४ देशांमध्ये हा व्हेरिएंट आढळला आहे.

डब्ल्यूएचओ साथीच्या आजाराबाबत दर आठवड्याला देत असलेल्या माहितीमध्ये डेल्टा विषाणूच्या संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. डब्ल्यूएचओ ने सांगितले आहे, की लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याचा विविध देशांचा प्रयत्न असला, तरी विविध देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सर्वाधिक कोरोनारुग्णांची नोंद इंडोनेशियामध्ये (साडेतीन लाख नवे रुग्ण) झाली. ब्रिटनमध्ये दोन लाख ९६ हजार ४४७ नवे रुग्ण, ब्राझीलमध्ये दोन लाख ८७ हजार ६१० नवे रुग्ण, भारतामध्ये दोन लाख ६८ हजार ८४३ नवे रुग्ण आढळून आले. अमेरिकेमध्ये दोन लाख १६ हजार ४३३ नवे रुग्ण आढळून आले. २० जुलैपर्यंत कोविड-१९चे २४ लाख नमुने जिनोमिक माहितीसाठी पाठविण्यात आले. त्यातील दोन लाख २० हजारांहून अधिक नमुने डेल्टा प्रकाराचे असल्याचे दिसले.

डेल्टाचा प्रसार ५० टक्क्यांनी अधिक
ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन, डेन्मार्क, भारत, इंडोनेशिया, इस्राईल, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन या देशांमध्ये डेल्टा चा प्रभाव ७५ टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसले आहे. डेल्टा मुळे कोरोनाचे इतर प्रकारांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून, येत्या काळात डेल्टा चाच प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. जगभरात अल्फा प्रकारचे विषाणू १८० देशांत, बीटा प्रकारचे विषाणू १३० देशांत, गॅमा प्रकारचे विषाणू ७८ देशांत, तर डेल्टा प्रकारचे विषाणू १२४ देशांत नोंदविले गेले आहेत.

डेल्टा आता सामान्य प्रकार
ब्रिटनमध्ये डेल्टा विषाणू चिंतेचा विषय राहिला नसून, तो सामान्य झाला असल्याचे ब्रिटनमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिटी यांनी सांगितले आहे. ब्रिटनमध्ये ९८ टक्के रुग्ण डेल्टा प्रकाराच्या कोरोनाचे झाल्यामुळे हा विषाणू आता चिंतेच्या पातळीवरील राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. डेल्टा प्रकारचा विषाणू मूळ कोरोना विषाणूपेक्षा ५० टक्क्यांनी अधिक प्रसारास कारणीभूत ठरतो.

‘हॅक’नाक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या