24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयगोताबयाच्या राजीनाम्याची मागणी

गोताबयाच्या राजीनाम्याची मागणी

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेतील आजवरचे सर्वात भीषण आर्थिक संकट हाताळू न शकल्यामुळे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी येथील एका समुद्रकिना-यावर गेला महिनाभराहून अधिक काळ निदर्शक तळ ठोकून आहेत. त्यांना अध्यक्षांनीच नेमलेले देशाचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पाठिंबा जाहीर केल्याची असाधारण घटना घडली आहे.

९ एप्रिलपासून कोलंबोच्या गॅले फेस ग्रीन येथे तळ ठोकलेल्या ‘गोता गो होम’ निदर्शकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आपण एक समिती नेमली असल्याचे पंतप्रधानांनी शनिवारी सांगितले. आपले मोठे बंधू महिंदा राजपक्षे यांना पद सोडण्यास सांगितल्यानंतर अध्यक्ष गोताबया यांनी विक्रमस्ािंघे यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या