काठमांडू : नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षांतर्गत कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पक्षाच्या सहअध्यक्ष पुष्पकुमार दहल प्रचंड यांनी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मात्र या सत्तासंघर्षाने उबगलेल्या नेपाळी जनतेने आता लोकशाहीलाच विरोध सुरु केला असून पुन्हा राजेशाही आणण्याची मागणी केली आहे.
नेपाळच्या अनेक भागात नागरिकांकडून विशेषत: तरुणांकडून उग्र आंदोलने होत आहेत. आंदोलकांच्या मते राजेशाहीच्या काळात ज्या कमतरता सरकारमध्ये होत्या;त्यात कोणतीही घट झालेली नसून उलटपक्षी वाढच झाली आहे. पक्षांतर्गत सत्तासंघषातच राजकारणी व्यस्त राहत असल्याने प्रजेपुढील समस्या संपत नाहीत. नेपाळ जगातील सर्वात भ्रष्ट देशांच्या यादीत उच्चस्थानावर आहे. मात्र यामध्ये सुधारणा करण्याची इच्छाशक्ती राजकारणी व सत्ताधाºयांमध्ये अजिबात दिसत नसल्याचा आक्षेप तरुण आंदोलकांकडून घेतला जात आहे.
राजघराण्याकडूनही वारंवार मागणी
नेपाळमधील पुर्वीचे राजे ज्ञानेंद्र यांनी वारंवार राजेशाही पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. मात्र काही वर्षांपुर्वी सत्ताधा-यांसह राजकीय पक्षांकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. मात्र आता खुद्द जनतेकडूनच राजेशाहीची मागणी होत असल्याने सरकारपुढील पेच वाढण्याची शक्यता आहे.
अडीचशे वर्ष राजेशाही
नेपाळमध्ये वर्ष २००८ पुर्वी अडीचशे वर्षे राजेशाही होती. राजे वीरेंद्र यांच्या परिवाराच्या राजपुत्राकडूनच झालेल्या हत्याकांडानंतर राजे ज्ञानेंद्र हे राजा झाले होते. मात्र नंतर लोकशाहीची मागणी वाढल्यानंतर २००८ मध्ये जनतेच्या आंदोलनापुढे शरणागती पत्करुन राजे ज्ञानेंद्र यांनी लोकशाही लागू करण्यास मंजूरी दिली होती.
लातूर जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण ९५.३९ टक्क्यांवर