Tuesday, September 26, 2023

भारतात लोकशाही जीवंत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन याच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जून रोजी अमेरिका दौ-यावर जाणार आहेत. यापूर्वी व्हाइट हाउसने सोमवारी भारताबद्दल एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये भारतातील लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणा-यांना सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.
अमेरिकेने म्हटले आहे की पीएम मोदी यांच्या राजवटीत भारतात लोकशाही जीवंत असून जर कोणाला याबद्दल शंका वाटत असेल तर ते नवी दिल्ली येथे जाऊन स्वत: पाहू शकतात. व्हाइट हाउसने त्यांच्या निवेदनात भारतातील लोकशाहीबद्दल उपस्थित शंका फेटाळल्या आहेत.

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. यादरम्यान त्यांनी न्यूयॉर्क शहरात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या दरम्यान व्हाइट हाऊसकडून हे वक्तव्य करण्यात आले आहे. व्हाइट हाऊसचे प्रमुख जॉन किर्बी यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, पीएम मोदी सरकारच्या काळात भारतात एक जीवंत लोकशाही पाहायला मिळत आहे. जर कोणाला याबद्दल शंका असेल तर ते नवी दिल्ली येथे जाऊन आपल्या डोळ्यांनी पाहू शकतात. मी खात्रीने सांगू शकतो का लोकशाही संस्थाचे सामर्थ्य आणि आरोग्य हा चर्चेचा भाग असेल.

राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल अमेरिकेतील प्रवासी भारतीयांना संबोधित करताना भारतीय लोकशाही दोन वेगवेगळ्या विचारधारांमध्ये विभागली गेली असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले की, भारतात दोन विचारधारांमध्ये संघर्ष सुरू आहे. एक ज्याचे आम्ही (काँग्रेस) प्रतिनिधीत्व करते तर दुसरी भाजप-आरएसएसची विचारधारा आहे. हे स्पष्ट करण्याचा सोपा माप्ग म्हणजे एकिकडे महात्मा गांधी आहेत दुसरीकडे नथुराम गोडसे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या