29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home आंतरराष्ट्रीय लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे; दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे; दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आंदोलक शेतक-यांना पाठिंबा दर्शवणा-या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर प्रथमच भाष्य केले आहे. ग्रेटाने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणात दिशाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. टूलकिटमध्ये बदल करून ती पुढे पाठवल्याचा आरोप दिशावर असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. दिशाच्या अटकेवरून ग्रेटाने लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली.

बंगळुरूतील दिशा रवी या कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी रविवारी तिच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील पटियाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते़ न्यायालयाने दिशाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येऊन शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा वादातीत मानवाधिकार आहे. हे कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अंग असायलाच हवेत, असे ग्रेटाने ट्विट करून म्हटले आहे.

 

छत्तीसगडमध्ये पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या